29.4 C
Mumbai
Friday, May 15, 2026
घरस्पोर्ट्सटी-२० वर्ल्ड कप जिंकवणारे स्टार IPL 2026 मध्ये फ्लॉप! संघांसाठी डोकेदुखी वाढली

टी-२० वर्ल्ड कप जिंकवणारे स्टार IPL 2026 मध्ये फ्लॉप! संघांसाठी डोकेदुखी वाढली

Google News Follow

Related

भारताला टी-२० वर्ल्ड कप २०२६ जिंकवून देणारे अनेक स्टार खेळाडू आयपीएल २०२६ मध्ये मात्र पूर्णपणे फ्लॉप ठरताना दिसत आहेत. वर्ल्ड कपमध्ये धडाकेबाज कामगिरी करणारे हेच खेळाडू आता रनसाठी झगडताना आणि विकेट्ससाठी तडफडताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या फ्रँचायझींची चिंता वाढली आहे.

सूर्यकुमार यादवची बॅट शांत

टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये मात्र अपयशी ठरत आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना सूर्या ११ सामन्यांत फक्त १९५ धावा करू शकला आहे. संपूर्ण हंगामात त्याच्या बॅटमधून केवळ एकच अर्धशतक झळकलं आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा सूर्या यंदा पूर्णपणे संघर्ष करताना दिसतोय.

हार्दिक पांड्याचा खराब काळ

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासाठी आयपीएल २०२६ एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरत आहे. ८ सामन्यांत त्याने १३६ च्या स्ट्राईक रेटने फक्त १४६ धावा केल्या आहेत. गोलंदाजीतही त्याला केवळ ४ विकेट्स मिळाल्या. त्याच्या कर्णधारपदावरही सतत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

शिवम दुबेचा संघर्ष कायम

चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेही यंदा लयीत दिसत नाही. १० सामन्यांत त्याच्या नावावर फक्त १६५ धावा आहेत. विशेष म्हणजे एकही अर्धशतक त्याला झळकावता आलेलं नाही. गोलंदाजीतही त्याने फक्त १ विकेट घेतली आहे.

जसप्रीत बुमराह पूर्णपणे फिका

टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीने सामना फिरवणारा जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये मात्र प्रभाव टाकू शकलेला नाही. मुंबई इंडियन्सकडून खेळताना ११ सामन्यांत त्याला फक्त ३ विकेट्स मिळाल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेटही ८.५१ इतका राहिला आहे.

अक्षर पटेलला धावा मिळेना

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेललाही यंदा फलंदाजीत संघर्ष करावा लागतोय. १२ सामन्यांत त्याने ११२ च्या स्ट्राईक रेटने फक्त १०० धावा केल्या आहेत. गोलंदाजीत त्याने १० विकेट्स घेतल्या असल्या तरी फलंदाजीतली निराशाजनक कामगिरी संघासाठी मोठी समस्या ठरली आहे.

अर्शदीप सिंह महागडा ठरतोय

पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह विकेट्स घेत असला तरी धावा रोखण्यात तो अपयशी ठरला आहे. ११ सामन्यांत १३ विकेट्स घेतलेल्या अर्शदीपचा इकॉनॉमी रेट तब्बल ९.९२ इतका आहे.

तिलक वर्माचा अस्थिर खेळ

तिलक वर्माने यंदा एक शतक झळकावलं असलं तरी इतर १० डावांत तो फक्त १६० धावा करू शकला. त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव स्पष्टपणे जाणवला आहे. तिलक आणि सूर्यकुमारच्या खराब फॉर्मचा फटका मुंबई इंडियन्सला बसताना दिसतोय.

कुलदीप यादवही अपयशी

फलंदाजांसाठी कायम कोडं ठरणारा कुलदीप यादव यंदा पूर्णपणे फिका पडला आहे. ११ सामन्यांत त्याला फक्त ७ विकेट्स मिळाल्या असून त्याचा इकॉनॉमी रेट १०.६६ इतका खराब राहिला आहे.

एकूणच, भारताला टी-२० वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या स्टार खेळाडूंची खराब कामगिरी आयपीएल २०२६ मध्ये चर्चेचा मोठा विषय ठरली आहे. अनेक संघांच्या अपयशामागे त्यांच्या प्रमुख खेळाडूंचा फॉर्म हेच सर्वात मोठं कारण मानलं जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
307,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा