28.8 C
Mumbai
Tuesday, June 30, 2026
घरस्पोर्ट्सविश्वचषकात महाउलटफेर! जर्मनीला पराग्वेचा धक्का

विश्वचषकात महाउलटफेर! जर्मनीला पराग्वेचा धक्का

पेनल्टी शूटआऊटमध्ये पराग्वेची बाजी; जर्मनीचे विश्वचषकातील आव्हान संपले

Google News Follow

Related

फीफा विश्वचषक २०२६ मध्ये सर्वात मोठ्या उलटफेरींपैकी एक पाहायला मिळाली. चार वेळचा विश्वविजेता जर्मनीला पराग्वेने पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ अशी मात देत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. बोस्टन स्टेडियमवर झालेला राऊंड ऑफ ३२ चा सामना निर्धारित वेळेत १-१ असा बरोबरीत सुटल्यानंतर निकालासाठी पेनल्टी शूटआऊटचा आधार घ्यावा लागला.

फीफा विश्वचषकाच्या इतिहासात जर्मनी यापूर्वी कधीही पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत झाला नव्हता. मात्र यावेळी पराग्वेने इतिहास रचत अखेरच्या १६ संघांमध्ये (प्री-क्वार्टर फायनल) दमदार प्रवेश केला.

सामन्याच्या ४२व्या मिनिटाला जुलिओ एन्सिसोने गोल करत पराग्वेला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात फ्लोरियन व्हिर्ट्झच्या अचूक क्रॉसवर काई हाव्हर्ट्झने शानदार हेडर करत जर्मनीला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर जोनाथन टाहचा हेडर जाळ्यात गेला, मात्र तो अमान्य ठरवण्यात आला. निर्धारित वेळ आणि अतिरिक्त वेळेत दोन्ही संघांना आणखी गोल करता आला नाही.

पेनल्टी शूटआऊटमध्ये जर्मनीची सुरुवातच खराब झाली. काई हाव्हर्ट्झचा पहिला प्रयत्न पराग्वेच्या गोलरक्षकाने रोखला. त्यानंतर पराग्वेने सातत्याने दबाव कायम ठेवला. जर्मनीकडून जोशुआ किमिश, जमाल मुसियाला आणि नादीम अमिरी यांनी गोल केले, तर निक वोल्टेमाडेचा प्रयत्न अपयशी ठरला.

दुसरीकडे, पराग्वेकडून मॉरिसिओ, गुस्तावो गोमेझ आणि मटियास गालार्झा यांनी अचूक फटके मारले. अँटोनियो सनाब्रियाचा निर्णायक प्रयत्न मॅन्युएल नोयरने रोखत जर्मनीच्या आशा जिवंत ठेवल्या. त्यानंतर फॅबियन बालबुएनाची पेनल्टीही नोयरने अडवली. मात्र अखेरीस जोसे कनालेने अत्यंत दडपणाच्या क्षणी अचूक पेनल्टी मारत पराग्वेला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

या विजयासह प्रशिक्षक गुस्तावो अल्फारो यांच्या मार्गदर्शनाखाली पराग्वेने प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली, तर चार वेळच्या विश्वविजेत्या जर्मनीचा विश्वचषकातील प्रवास राऊंड ऑफ ३२ मध्येच संपुष्टात आला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा