28.9 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरस्पोर्ट्स‘सॅमसनला डच्चू नको!

‘सॅमसनला डच्चू नको!

Google News Follow

Related

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात अवघ्या ११ धावांवर बाद झालेल्या संजू सॅमसनच्या बाजूने भारताचे माजी फलंदाज चेतेश्वर पुजारा यांनी ठाम भूमिका घेतली आहे. काही सामन्यांमध्ये अपयश आले म्हणून सॅमसनच्या प्लेइंग-११मधील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये, असे पुजारांनी स्पष्ट केले.

सॅमसनला एशियन गेम्स २०२६मध्येही अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. त्याने अनुक्रमे ९, ७ आणि २ धावा केल्या होत्या. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातही त्याची बॅट शांत राहिली.

पुजारांनी ‘जिओहॉटस्टार’शी बोलताना सॅमसनला पाठिंबा देताना म्हटले, “त्याच्यावर कोणताही दबाव नसावा, कारण तसा दबाव असण्याचे कारण नाही. त्याने भारतीय संघासाठी विश्वचषक जिंकला आहे आणि तेथे शानदार कामगिरी केली आहे. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्यामुळे प्लेइंग-११मध्ये त्याच्या स्थानाबाबत कोणताही प्रश्नच निर्माण व्हायला नको.”

सॅमसनला आणखी काही संधी दिल्यास तो नक्कीच दमदार कामगिरी करेल, असा विश्वासही पुजारांनी व्यक्त केला. “एक-दोन सामने खराब जाऊ शकतात. अशा वेळी संघ व्यवस्थापनाने त्याच्याशी संवाद साधून ‘तू संघाचा महत्त्वाचा भाग आहेस, प्लेइंग-११मध्ये कायम राहशील. मैदानावर जा, मोकळेपणाने खेळ आणि तुझा नैसर्गिक खेळ कर’ असा विश्वास द्यायला हवा,” असे पुजारा म्हणाले.

टी-२० क्रिकेटमध्ये अधूनमधून अपयश येतच असते. अशा वेळी खेळाडूला योग्य संदेश देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. वैभव सूर्यवंशीलाही योग्य वेळी संधी मिळेल, मात्र संघात वारंवार बदल करण्याची गरज नसल्याचे पुजारांनी स्पष्ट केले.

अभिषेक शर्मालाही पुजारांचा पाठिंबा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्मा ऑफस्पिनर रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर लवकर बाद झाला. मात्र, एका खराब सामन्यावरून त्याचे मूल्यमापन करू नये, असे पुजारांनी सांगितले.

“अभिषेकने वेगवान गोलंदाजांविरुद्ध चांगली सुरुवात केली होती. मात्र, लखनऊच्या खेळपट्टीवर फिरकीला मिळणारी मदत शाई होपने लवकर ओळखली. ऑफस्पिनर्सविरुद्ध अभिषेकची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. त्याने यात सुधारणा केली आहे, पण लखनऊमध्ये पुन्हा एकदा त्याची फिरकीविरुद्धची रणनीती योग्य ठरली नाही,” असे पुजारा म्हणाले.

रोस्टन चेसविरुद्ध अभिषेकने फटका निवडताना अधिक सावध राहण्याची गरज होती, असेही पुजारांनी नमूद केले. मात्र, तो चेंडू चांगल्या प्रकारे टायमिंग करत असल्याने लवकरच आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“हा फक्त एक खराब दिवस होता. सामन्यांदरम्यान पुरेसा वेळही नव्हता. त्यामुळे केवळ एका सामन्यावरून त्याचे जास्त मूल्यमापन करता येणार नाही. दुसऱ्या टी-२०मध्ये तो शानदार कामगिरी करण्यासाठी सज्ज असेल,” असे पुजारा म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा