31 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरस्पोर्ट्सपॅरालिम्पिकमध्ये अवनीचा ऐतिहासिक ठसा!

पॅरालिम्पिकमध्ये अवनीचा ऐतिहासिक ठसा!

Google News Follow

जयपूरमध्ये जन्मलेल्या अवनी लेखराने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे. वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी झालेल्या अपघातामुळे तिच्या कमरेखालचा भाग लुळा पडला. मात्र, या संकटापुढे ती झुकली नाही. व्हीलचेअरवरूनच तिने आयुष्याची नवी लढाई सुरू केली आणि नेमबाजीत आपले वेगळे स्थान निर्माण केले.

२०२० च्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये अवनीने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकत इतिहास घडवला. त्याच स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. त्यानंतर २०२४ च्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्येही १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

अशा प्रकारे दोन सुवर्ण आणि एक कांस्य अशी तीन पॅरालिम्पिक पदके जिंकणारी अवनी पहिली भारतीय महिला ठरली आहे. नुकत्याच जपानमध्ये झालेल्या आशियाई पॅरा स्पर्धेतही तिने रौप्यपदक जिंकले.

नेमबाजीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी अवनीला मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिचा हा प्रवास देशातील लाखो दिव्यांगांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा