30 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरस्पोर्ट्स"कॅप्टन की रन मशीन?"

“कॅप्टन की रन मशीन?”

Google News Follow

Related

आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जचे कर्णधार आणि तुफानी फलंदाज श्रेयस अय्यर सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये अय्यर हा एकमेव कॅप्टन ठरला आहे ज्याने २०० च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना ८० पेक्षा जास्त सरासरी गाठली आहे.

श्रेयस अय्यरने आतापर्यंत ४ सामने खेळून १६८ धावा फटकावल्या असून त्यातील सर्वोच्च स्कोर आहे ९७ धावा. त्याने १० चौकार आणि १४ षटकार खेचले असून दोन अर्धशतकेही झळकावली आहेत. मागील दोन सामन्यांत त्याचा बॅट शांत असला तरी, इतर कॅप्टनच्या तुलनेत त्याची स्ट्राइक रेट सर्वाधिक आहे.

इतर कर्णधारांचा परफॉर्मन्स –

  • हार्दिक पांड्या (मुंबई इंडियन्स) – स्ट्राइक रेट: १६८.७५ | धावा: ८१ (३ डावांत) | ६ चौकार, ५ षटकार

  • रजत पाटीदार (आरसीबी) – स्ट्राइक रेट: १६१.७४ | धावा: १८६ (५ डावांत) | १७ चौकार, ९ षटकार | २ अर्धशतके, २ वेळा ‘प्लेयर ऑफ द मॅच’

  • अजिंक्य रहाणे (केकेआर) – स्ट्राइक रेट: १६०.०० | धावा: १८४ (५ डावांत) | १७ चौकार, १२ षटकार

  • संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स) – स्ट्राइक रेट: १५०.८५ | धावा: १७८ | सुरुवातीचे काही सामने अनुपस्थित

  • रुतुराज गायकवाड (सीएसके) – स्ट्राइक रेट: १५०.६१ | धावा: १२२ | २ अर्धशतके

  • शुभमन गिल (गुजरात टायटन्स) – स्ट्राइक रेट: १४६.५३ | धावा: १४८

  • अक्षर पटेल (दिल्ली कॅपिटल्स) – स्ट्राइक रेट: १६१.११ | धावा: ५६ (३ डावांत)

  • पॅट कमिन्स (एसआरएच) – स्ट्राइक रेट: १५५.५५ | धावा: ५६ (५ डावांत)

  • ऋषभ पंत (लखनऊ सुपरजायंट्स) – स्ट्राइक रेट: फक्त ५९.३७ | धावा: १९ (४ डावांत) | फक्त १ षटकार

श्रेयस अय्यरने आपल्या नेतृत्वगुणांबरोबरच तडाखेबाज फलंदाजीनेही एक वेगळी छाप उमटवली आहे. पुढील सामन्यांत तो आणखी काय कमाल करतो, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहील!

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा