29.2 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरस्पोर्ट्सइंग्लंडमधील भारतीय वंशाची बोधना शिवानंदन ११व्या वर्षी बनली ग्रँडमास्टर

इंग्लंडमधील भारतीय वंशाची बोधना शिवानंदन ११व्या वर्षी बनली ग्रँडमास्टर

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये केली कामगिरी

Google News Follow

भारतीय वंशाच्या ११ वर्षीय बोधना शिवानंदन हिने बुद्धिबळाच्या विश्वात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. उझबेकिस्तानमधील समरकंद येथे सुरू असलेल्या ४६व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना बोधनाने आपला तिसरा आणि अंतिम महिला ग्रँडमास्टर (डब्ल्यूजीएम) नॉर्म मिळवला. यासह ती इतिहासातील सर्वांत कमी वयात महिला ग्रँडमास्टरचा किताब मिळवणारी खेळाडू ठरली आहे.

इंग्लंडच्या महिला संघासाठी पहिल्या पटावर खेळताना बोधनाने संघाचे नेतृत्व केले. तिने ११ पैकी सहा सामने जिंकत ८ गुणांची कामगिरी केली. तिच्या कामगिरीमुळे इंग्लंडचा महिला गटात १५वा क्रमांक आला. पहिल्या पटावर खेळलेल्या खेळाडूंमध्ये बोधना स्पर्धेतील १३व्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी करणारी खेळाडू ठरली.

यापूर्वी सर्वांत कमी वयात महिला ग्रँडमास्टर किताब मिळवण्याचा विक्रम रशियाच्या ग्रँडमास्टर कॅटरिना लाग्नो हिच्या नावावर होता. तिने वयाच्या १२व्या वर्षी हा किताब मिळवला होता. चीनची माजी विश्वविजेती होउ यीफान हिनेही वयाच्या १२व्या वर्षी महिला ग्रँडमास्टरचा किताब मिळवला होता.

हे ही वाचा:

भाजपच्या नव्या टीमला मोठी जबाबदारी

भारत-म्यानमार सीमेवर आसाम रायफल्सचा जवान हुतात्मा

पॉलिसीबाजारचा शेअर ४३ टक्क्यांनी कोसळला

एसबीआयच्या खात्यातून चारवेळा मोफत पैसे काढा!

कोविड काळात सुरू झाला बुद्धिबळाचा प्रवास

बोधनाचा बुद्धिबळाशी परिचय कोविड-१९ लॉकडाऊनच्या काळात झाला. तिच्या वडिलांच्या एका मित्राने भारतातून परतताना बोधना यांच्या कुटुंबाला काही बॅग दिल्या होत्या. त्यापैकी एका बॅगेत बुद्धिबळाचा पट होता. या बुद्धिबळाच्या पटाने बोधनाची या खेळाबद्दलची उत्सुकता वाढवली. त्यानंतर तिने स्वतःहून बुद्धिबळाचे डावपेच शिकण्यास सुरुवात केली. तिच्या नैसर्गिक प्रतिभेची झलक लवकरच दिसू लागली.

२०२२ च्या युरोपियन स्कूल्स चॅम्पियनशिपमध्ये बोधनाने सर्व २४ सामने जिंकत आपली क्षमता सिद्ध केली. त्यानंतर अवघ्या एका वर्षात ग्रँडमास्टरविरुद्धच्या स्पर्धात्मक सामन्यात पराभूत न होणारी सर्वांत कमी वयाची खेळाडू म्हणूनही तिच्या नावावर विक्रम नोंदवला गेला.

वयाच्या ९व्या वर्षी इंग्लंडच्या संघात

वयाच्या अवघ्या ९व्या वर्षी बोधनाची २०२४ च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी इंग्लंडच्या संघात निवड झाली. त्यावेळी कोणत्याही खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणारी ती सर्वांत कमी वयाची खेळाडू ठरली होती. आता वयाच्या ११व्या वर्षी महिला ग्रँडमास्टर किताब मिळवत बोधनाने आपल्या नावावर आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली आहे. उत्तर-पश्चिम लंडनमध्ये राहणारी बोधना बुद्धिबळासोबतच शिक्षणातही हुशार आहे. ती यूके ओपन महिला ब्लिट्झ चॅम्पियन आहे. तसेच तिने ब्रिटिश महिला रॅपिड चॅम्पियन हा किताबही संयुक्तपणे मिळवला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा