29.6 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरदेश दुनियाबांगलादेशात अणुइंधन नेणाऱ्या रशियन विमानाला पाकने एअरस्पेस नाकारली

बांगलादेशात अणुइंधन नेणाऱ्या रशियन विमानाला पाकने एअरस्पेस नाकारली

रशियाचा विमानमार्ग बदलला

Google News Follow

बांगलादेशच्या रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी रशियातून पाठवण्यात येणाऱ्या अणुइंधनाच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. अणुइंधन घेऊन जाणाऱ्या रशियन मालवाहू विमानाला पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दीतून जाण्याची परवानगी न दिल्याने नियोजित उड्डाण पुढे ढकलण्यात आले. हे इंधन रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या युनिटसाठी पाठवण्यात येणार होते.

बांगलादेशचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फकीर महबूब अनाम यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांच्या माहितीनुसार, हे विमान २४ सप्टेंबरला बांगलादेशात पोहोचणे अपेक्षित होते. मात्र पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाण्यासाठी आवश्यक परवानगी न मिळाल्याने अणुइंधन नियोजित वेळेत पोहोचू शकले नाही.

या प्रकरणावर पाकिस्तानच्या ढाका येथील उच्चायोगाने स्पष्टीकरण दिले आहे. हवाई मार्ग आणि ओव्हरफ्लाइट परवानगीशी संबंधित तांत्रिक आणि प्रक्रियात्मक बाबींमुळे उड्डाणाच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतात, असे पाकिस्तानने म्हटले आहे. या घटनेकडे केवळ तांत्रिक संदर्भात पाहावे, असेही पाकिस्तानच्या उच्चायोगाने स्पष्ट केले.

पाकिस्तानकडून परवानगी न मिळाल्यानंतर रशियाची अणुऊर्जा कंपनी रोसाटॉमने अणुइंधनाच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था केली आहे. रूपपूर प्रकल्पाच्या दुसऱ्या युनिटसाठी अणुइंधनाचा पुरवठा ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार असून डिसेंबरपर्यंत इंधनाच्या सर्व खेपा बांगलादेशात पोहोचवण्याचे नियोजन आहे. यासाठी सात स्वतंत्र मालवाहू उड्डाणे होणार असल्याचे रोसाटॉमने म्हटले आहे.

हे ही वाचा:

दहशतवाद या भारताच्या चिंतेची दखल न घेतल्यास संबंधांवर परिणाम

संभल हिंसाचारातील आरोपीची राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गातील अटक रद्द

गोल्डी ब्रार एफबीआयच्या ‘१० मोस्ट वॉन्टेड’ यादीत

बलुच सशस्त्र महिलांनी केला नऊ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा

रूपपूर हा बांगलादेशचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. रशियाच्या रोसाटॉमच्या तांत्रिक सहकार्याने उभारल्या जात असलेल्या या प्रकल्पात दोन VVER-1200 अणुभट्ट्या आहेत. दोन्ही युनिट्सची एकत्रित क्षमता २,४०० मेगावॅट आहे. बांगलादेश सध्या वीजटंचाईच्या समस्येला सामोरा जात असून देशाची ऊर्जा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायू आणि आयात केलेल्या इंधनावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत रूपपूर प्रकल्प लवकर कार्यान्वित होणे बांगलादेशच्या वीजपुरवठ्यासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा