28.2 C
Mumbai
Tuesday, August 11, 2026
घरस्पोर्ट्स‘नरेंदर’… नाम ही काफी है!

‘नरेंदर’… नाम ही काफी है!

मोदींसमोर नरेंदरचा पाकिस्तानी बॉक्सरचा भन्नाट किस्सा

Google News Follow

Related

कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदक जिंकल्यानंतर खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद असतोच; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीत भारतीय बॉक्सर नरेंदरने असा किस्सा सांगितला की, खुद्द मोदींनाही हसू आवरता आलं नाही.

कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारताने तब्बल १३ सुवर्णांसह ३९ पदकांची कमाई केली. या पदकविजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ९० किलोपेक्षा अधिक वजनी गटात रौप्यपदक पटकावणाऱ्या नरेंदरने पाकिस्तानच्या बॉक्सरसोबतचा भन्नाट किस्सा मोदींना सांगितला.

नरेंदरने सांगितले की, २०१५ मध्ये वर्ल्ड मिलिटरी गेम्ससाठी तो सहभागी झाला होता. विशेष म्हणजे त्याची पहिलीच लढत पाकिस्तानच्या बॉक्सरविरुद्ध होती. भारतीय लष्कराकडून त्याला फोनही आला होता—“काहीही झालं तरी पाकिस्तानकडून हरायचं नाही!”

पहिल्या बाउटमध्ये नरेंदरने पाकिस्तानी बॉक्सरचा ४-१ असा पराभव केला. दुसऱ्या बाउटमध्ये मात्र चांगलीच चुरस पाहायला मिळाली. दोन्ही बॉक्सरच्या डोक्यांची धडक झाली आणि दोघांनाही दुखापत झाली. तरीही नरेंदरने ३-२ असा विजय मिळवला.

यानंतर दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंमत म्हणजे नरेंदरसोबत गेलेल्या भारतीय लष्कराच्या प्रशिक्षकाचे नावही नरेंदर राणा होते.

याच मुद्द्यावरून पाकिस्तानी बॉक्सरने नरेंदरची फिरकी घेतली. त्याने म्हटले, “तुझं नाव नरेंदर, तुझ्या कोचचं नाव नरेंदर आणि तुझ्या देशाच्या पंतप्रधानांचं नावही नरेंदर! मला आता ‘नरेंदर’ नावाचीच नफरत झाली आहे!”

नरेंदरने हा किस्सा मोदींना सांगितल्यानंतर पंतप्रधान मोदी जोरजोरात हसताना दिसले. भेटीतील हा प्रसंग उपस्थितांमध्येही चांगलाच चर्चेचा विषय ठरला.

दरम्यान, कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये नरेंदरने शानदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. मात्र सुवर्णपदकापासून तो एका पायरीने दूर राहिला. अंतिम सामन्यात इंग्लंडच्या डामार थॉमसने नरेंदरचा ५-० असा पराभव केला.

भारतीय बॉक्सिंग संघासाठी मात्र ही स्पर्धा संस्मरणीय ठरली. पुरुष आणि महिला बॉक्सरनी मिळून तब्बल १० पदकांची कमाई करत भारताच्या पदकतालिकेत मोलाची भर घातली.

एकूणच, रिंगमध्ये पंचांचा निर्णय वेगळा असला तरी ‘नरेंदर’ नावाचा हा किस्सा मोदींच्या भेटीत मात्र चांगलाच हिट ठरला!

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा