29.1 C
Mumbai
Monday, October 12, 2026
घरस्पोर्ट्सएशियन गेम्ससाठी महिला हॉकी संघ जाहीर

एशियन गेम्ससाठी महिला हॉकी संघ जाहीर

Google News Follow

Related

हॉकी इंडियाने १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान जपानमध्ये होणाऱ्या २०व्या एशियन गेम्स (ऐची-नागोया २०२६) स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा केली. सलीमा टेटे हिच्याकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

नुकतेच एफआयएच नेशन्स कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या सलीमा टेटेवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सविता आणि बिचू देवी खारिबाम यांची गोलरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

मुख्य प्रशिक्षक शोर्ड मारिन यांनी निवडलेल्या २० सदस्यीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य समतोल साधल्याचे सांगितले. बचावफळीत सुशीला चानू, इशिका चौधरी, ज्योती, लालथंतलुआंगी आणि शिल्पी डबास यांना स्थान मिळाले आहे.

मधल्या फळीत सलीमा टेटे, निक्की प्रधान, साक्षी राणा, सुनेलिता टोप्पो, नेहा आणि दीपिका सोरेंग यांचा समावेश आहे. आक्रमण फळीत लालरेमसियामी, रुतुजा पिसल, नवनीत कौर, दीपिका, इशिका, बलजीत कौर आणि ब्युटी डुंगडुंग यांची निवड करण्यात आली आहे.

मारिन यांनी या संघाकडून एशियन गेम्समध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त करत खेळाडूंच्या फिटनेस आणि फॉर्मबाबत समाधान व्यक्त केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा