29.8 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरस्पोर्ट्सभारताचा हॉकीत विक्रमी सहावा आशियाई मुकुट!

भारताचा हॉकीत विक्रमी सहावा आशियाई मुकुट!

Google News Follow

भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. गुरुवारी ऑलिम्पियन बलबीर सिंह सीनियर आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने जपानचा ४-१ असा धुव्वा उडवत विक्रमी सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. या विजयासह भारताने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याची किमया साधली. विशेष म्हणजे, संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत भारतीय संघाने अजिंक्यपदाला गवसणी घातली.

अंतिम सामन्यात सुरुवातीला जपानने भारताला धक्का दिला. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला काझुमासा मात्सुमोतोने अप्रतिम टोमहॉक शॉट मारत जपानला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जपानने भारतावर दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. २०व्या मिनिटाला जपानला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले; मात्र भारतीय बचावफळीने हे प्रयत्न हाणून पाडले.

पहिल्या सत्रात ०-१ ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने उत्तरार्धात जोरदार पुनरागमन केले. ३३व्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला; मात्र कर्णधार हरमनप्रीत सिंहचा फटका जपानच्या गोलरक्षकाने अडवला.

अखेर ४२व्या मिनिटाला भारताला यश मिळाले. आदित्य अर्जुन लालागेच्या पासवर शिलानंद लाकडाने रिबाउंडवर गोल करत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर ४८व्या मिनिटाला हार्दिकच्या अप्रतिम पासवर दिलप्रीत सिंहने रिव्हर्स हिट मारत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

आघाडी मिळाल्यानंतर भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास आणखी वाढला. ५३व्या मिनिटाला जुगराज सिंहने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत भारताची आघाडी ३-१ अशी केली. त्यानंतर अवघ्याच एका मिनिटात म्हणजे ५४व्या मिनिटाला विवेक सागर प्रसादने सर्कलच्या बाहेरून जोरदार फटका मारत चौथा गोल नोंदवला.

शेवटच्या क्षणी जपानला पेनल्टी कॉर्नर मिळाला; मात्र त्यांना गोल करता आला नाही. अखेर भारताने ४-१ असा दणदणीत विजय मिळवत सहाव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

भारताने यापूर्वी २०११, २०१६, २०१८, २०२३ आणि २०२४ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. आता २०२६ मध्ये सहाव्यांदा अजिंक्यपद मिळवत भारतीय हॉकी संघाने नवा विक्रम प्रस्थापित केला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा