31 C
Mumbai
Monday, October 5, 2026
घरस्पोर्ट्सअमेरिकेच्या निर्बंधांवर इराण आक्रमक!

अमेरिकेच्या निर्बंधांवर इराण आक्रमक!

Google News Follow

Related

हरान : फिफा विश्वचषक २०२६ दरम्यान इराणच्या राष्ट्रीय फुटबॉल संघावर लादण्यात आलेल्या प्रवास निर्बंधांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सह-यजमान असलेल्या अमेरिकेने इराणी खेळाडूंवर घातलेल्या विशेष अटींविरोधात इराण फुटबॉल महासंघाने फिफाकडे अधिकृत तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

इराणच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या खेळाडूंना सामना होण्याच्या केवळ एक दिवस आधी अमेरिकेत प्रवेश दिला जात आहे. तसेच व्हिसाच्या अटींनुसार सामना संपल्यानंतर त्याच दिवशी देश सोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांमुळे संघाच्या सराव, विश्रांती आणि सामन्यापूर्व तयारीवर गंभीर परिणाम होत असल्याचा दावा महासंघाने केला आहे.

शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात इराण फुटबॉल महासंघाने म्हटले की, “अशा प्रकारच्या निर्बंधांमुळे सर्व सहभागी संघांना समान संधी आणि वातावरण देण्याच्या फिफाच्या तत्त्वालाच धक्का बसतो. त्यामुळे आम्ही या निर्णयाविरोधात अधिकृत आक्षेप नोंदवून फिफाकडे तक्रार करणार आहोत.”

दरम्यान, इराणचे मुख्य प्रशिक्षक आमिर घालेनोई यांनीही या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या २-२ अशा बरोबरीत सुटलेल्या सामन्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, लॉस एंजेलिसमधील सामना संपताच संघाला तातडीने मेक्सिकोतील तिजुआना कॅम्पमध्ये परतण्याचे आदेश देण्यात आले.

घालेनोई म्हणाले, “आम्हाला सामन्यापूर्वी दोन दिवस आधी अमेरिकेत पोहोचायचे होते, पण त्याची परवानगी मिळाली नाही. आम्ही संपूर्ण विश्वचषकात सर्वाधिक दबावाखाली खेळणारा संघ आहोत. आमचे व्यवस्थापन, माध्यमे आणि फेडरेशनचे प्रतिनिधी आमच्यासोबत नाहीत.”

या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर इराणचा पुढील सामना बलाढ्य बेल्जियमविरुद्ध होणार आहे. मात्र, मैदानावरील प्रतिस्पर्ध्यांइतकीच लढाई आता इराणला मैदानाबाहेरही लढावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा