31 C
Mumbai
Monday, November 16, 2026
घरस्पोर्ट्सजय शाह दुसऱ्यांदा बिनविरोध आयसीसीच्या अध्यक्षपदी

जय शाह दुसऱ्यांदा बिनविरोध आयसीसीच्या अध्यक्षपदी

विश्वास आणि पाठिंब्याबद्दल मानले आभार

Google News Follow

जय शाह यांची दुसऱ्या कार्यकाळासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड झाली आहे. बाली येथे झालेल्या बैठकीदरम्यान आयसीसीच्या संचालक मंडळाने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

ऑगस्ट २०२४ मध्ये शाह यांची एकमताने आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी या पदावर पोहोचणारे ते सर्वात तरुण व्यक्ती ठरले होते. त्यांनी १ डिसेंबर २०२४ पासून आयसीसी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. तत्कालीन अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शाह हे एकमेव उमेदवार राहिले होते. जगमोहन दालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांच्यानंतर आयसीसीचे प्रमुख बनणारे ते पाचवे भारतीय ठरले होते.

या फेरनिवडीमुळे आयसीसीच्या नेतृत्वात स्थिरता कायम राखण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, क्रिकेट लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ च्या तयारीला लागले असताना ही निवड झाली आहे. जगभरात क्रिकेटचा विस्तार करणे, अधिकाधिक लोकांना या खेळाशी जोडणे आणि क्रिकेटच्या व्यावसायिक विकासाला चालना देणे, हेही या निर्णयामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.

हे ही वाचा:

जे. पी. नड्डांच्या ताफ्यावरील हल्ल्याप्रकरणी तृणमूलचा नेता अटकेत

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिस ठप्प झाल्याने ग्राहकांना भरपाईची संधी

झाडांवर जाहिराती लावणाऱ्यांनो सावधान!

मराठवाड्याचं करायचं काय, करावा कोणता उपाय?

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, संचालक मंडळाच्या सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावानंतर शाह यांची फेरनिवड करण्यात आली. क्रिकेटच्या विकासाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर त्यांच्या नेतृत्वावर मंडळाने विश्वास व्यक्त केला आहे. लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ मध्ये क्रिकेटचा समावेश हे आयसीसीच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट अधिक मजबूत करणे, महिला क्रिकेटचा विस्तार करणे, सहयोगी सदस्य देशांसाठी अधिक संधी निर्माण करणे आणि खेळाची दीर्घकालीन व्यावसायिक स्थिरता सुनिश्चित करणे, या बाबींनाही प्राधान्य दिले जाणार आहे.

पुनर्निवडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जय शाह यांनी मंडळाने दाखवलेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल आभार मानले. सदस्य देशांसोबत मिळून जागतिक स्तरावर क्रिकेटचा विकास करण्याच्या आपल्या जबाबदारीवरही त्यांनी भर दिला.

शाह म्हणाले, “आयसीसीच्या संचालक मंडळाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मी अत्यंत सन्मानित झालो आहे. सर्व संचालकांनी सातत्याने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. आयसीसी अध्यक्ष म्हणून काम करणे ही माझ्यासाठी सन्मानाची आणि जबाबदारीची बाब आहे. जगभरात क्रिकेटचे हित पुढे नेण्यासाठी मी सदस्य देशांसोबत मिळून काम करण्यास कटिबद्ध आहे.”

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ईसीबी) अध्यक्ष रिचर्ड थॉम्पसन यांनीही जय शाह यांच्या नेतृत्वाचे स्वागत केले. थॉम्पसन म्हणाले, “जय शाह यांच्या नेतृत्वामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी हा अत्यंत महत्त्वाचा काळ ठरणार आहे. क्रिकेटमध्ये वेगाने बदल होत असल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक अधिक मजबूत करणे, द्विपक्षीय क्रिकेटची प्रासंगिकता आणि स्पर्धात्मकता टिकवून ठेवणे तसेच प्रमुख स्पर्धा या खेळाच्या भविष्याचा केंद्रबिंदू राहतील, याची खात्री करणे आवश्यक आहे.”

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा