28 C
Mumbai
Thursday, February 12, 2026
घरस्पोर्ट्समालाडमध्ये २२ फेब्रुवारीला शरीरसौष्ठवाचा थरार

मालाडमध्ये २२ फेब्रुवारीला शरीरसौष्ठवाचा थरार

ज्युनियर मुंबई श्रीसह दिव्यांग आणि मास्टर्स स्पर्धा

Google News Follow

Related

 जिद्द, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर शरीर घडवणाऱ्या तरुणाईला मोठ्या व्यासपीठावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी देणारी ‘दिव्यांग / मास्टर्स / ज्युनियर मुंबई श्री २०२६’ तसेच ‘ज्युनियर मुंबई मेन्स फिजीक’ ही बहुप्रतिक्षित शरीरसौष्ठव स्पर्धा रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता जय भवानी व्यायाम मंदिर ट्रस्ट यांच्या विद्यमाने मालाड (पूर्व) येथील पंडित दिनदयाल उपाध्याय उद्यान, कासम बाग येथे रंगणार आहे. स्पर्धेपूर्वी दुपारी १ ते ४ या वेळेत वजन व उंची तपासणी होणार असून, ही तपासणीच अनेक खेळाडूंसाठी अंतिम कसोटी ठरणार आहे. अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिली.

या स्पर्धेत ज्युनियर मुंबई श्री अंतर्गत ५५ किलोपासून ७५ किलोवरील असे एकंदर सहा वजनी गट, मास्टर्स मुंबई श्रीमध्ये ४० ते ५०, ५० ते ६० आणि ६० वर्षांवरील गट, तर दिव्यांग मुंबई श्री व ज्युनियर मुंबई मेन्स फिजीकसाठी स्वतंत्र खुले गट ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नवख्या ज्युनियर खेळाडूंना अनुभवी शरीरसौष्ठवपटूंसोबत एकाच व्यासपीठावर चमक दाखवण्याची प्रेरणादायी संधी मिळणार आहे.

हे ही वाचा:

सरकारी कार्यक्रमांमध्ये सहा कडव्यांचे ‘वंदे मातरम्’ अनिवार्य!

गोवंडीत ‘लव्ह ट्रँगल’चा रक्तरंजित शेवट; १९ वर्षीय तरुणीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

AI कंटेंटवर सरकारची थेट कारवाई

शेअर बाजारात तेजी कायम

या स्पर्धेचे आकर्षण केवळ रंगतदार सादरीकरणापुरते मर्यादित नसून पारितोषिकांमध्येही मोठा दम आहे. ज्युनियर मुंबई श्री व ज्युनियर मुंबई मेन्स फिजीकच्या प्रत्येक वजनी गटात पहिल्या पाच क्रमांकांना अनुक्रमे ३,०००, २,५००, २,०००, १,५०० व १,००० रुपये रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्रे, तसेच पहिल्या तीन विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके दिली जाणार आहेत. सहा गटांतील किताब विजेत्यास १५ हजार रुपये रोख व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. दिव्यांग मुंबई श्री गटातही पहिल्या पाच विजेत्यांना रोख बक्षिसे व प्रशस्तीपत्रे, तर मास्टर्स मुंबई श्री गटात पहिल्या तीन विजेत्यांना पदके आणि पहिल्या पाच विजेत्यांना प्रशस्तीपत्रे दिली जातील.

ही स्पर्धा म्हणजे अनेक ज्युनियर खेळाडूंसाठी स्वप्नांच्या प्रवासाची सुरुवात ठरणार असून, येथूनच उद्याचे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शरीरसौष्ठवपटू घडतील, अशी आशा संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी व्यक्त केली आहे.

स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी सुनिल शेगडे (९२२३३४८५६८), विशाल परब (८९२८३१३३०३), राजेश निकम (९९६९३६९१०८), राम नलावडे (९८२०६६२९३२), किरण कुडाळकर (९८७०३०६१२७), विजय झगडे (९९६७४६५०६३), अब्दुल मुकादम (७९७७३२१८८५), जयदिप पवार (८०८०८०९४३८) व सुभाष जाधव (९००४३१३४३९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा