अडीच वर्षांहून अधिक काळानंतर, मणीपूरशी संबंधित हिंसाचाराव्यतिरिक्त “कुकी-मैतेई” शब्द पुन्हा चर्चेत आलेत पण वेगळ्या कारणासाठी.
भारताच्या १७ वर्षांखालील फुटबॉल संघाने रविवारी रात्री अहमदाबादच्या ईकेए अरेना येथे एएफसी U-१७ आशिया कप २०२६ च्या शेवटच्या क्वालिफायर सामन्यात आशियातील दिग्गज इराणला २-१ ने हरवून इतिहास रचला आणि पुढील वर्षी सौदी अरेबियात होणाऱ्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
भारतालाच हा विजय मिळवून देणारी दोन्ही गोल मणिपूरमधील संघर्षग्रस्त दोन समुदायांतील खेळाडूंनी केले.
या सामन्यात इराणने १९व्या मिनिटाला पहिला गोल केला. हाफटाईमच्या अगोदर डललमूवन गंगटे यांनी पेनल्टीवरून बरोबरी साधली. नंतर, काउंटर-अटॅकवर गुन्लैबा वांगखेइरकपम यांनी दुसरा गोल करून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
हे ही वाचा:
नीरव मोदी, मल्ल्या, चोक्सीकडून ५८ हजार कोटी गडप
डिजिटल अरेस्टच्या सर्व प्रकरणांची चौकशी करा, बँकांची भूमिका देखील तपासा!
गावस्कर कोहलीच्या धमाकेदार खेळीवर खुश
हिवाळी अधिवेशन: पहिल्या दिवशी अर्थमंत्र्यांनी लोकसभेत मांडली ‘ही’ दोन विधेयके
मणिपूरमधील प्रतिक्रिया
मे २०२३ पासून चालू असलेल्या जातीय संघर्षांत ६० हजारहून अधिक लोक विस्थापित झाले असून २५० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीतही सोशल मीडियावर विभागणी दिसून आली. मैतेई समुदायाने आपल्या खेळाडूचा गौरव केला,
तर कुकी समुदायाने आपल्या खेळाडूचा सन्मान केला. परंतु दोन्ही गोल भारतासाठी होते. काही सोशल मीडिया हँडल्सनी या विजयाला शांतीची आशा म्हणून पाहिले.
“अभिनंदन टीम इंडिया. भारतासाठी केलेले दोन गोल एक कुकी आणि एक मैतेई खेळाडूने केले (डी. गंगटे आणि जी. वांगखेइरकपम), ज्यामुळे भारत एएफसी १७ वर्षांखालील आशिया चषक २०२६ साठी पात्र ठरला,” असे मैतेई हेरिटेज सोसायटीने ‘एक्स’ वर पोस्ट केले.
त्यांनी पुढे लिहिले: “स्पोर्ट्स युनाइट. आपल्या मणिपूर राज्यात शांतता लवकरच यावी ही आशा!”







