29.7 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरस्पोर्ट्सलैंगिक गैरवर्तनावरून पॅरा जलतरणपटू मोहम्मद शम्स आलमला भारतात पाठवले

लैंगिक गैरवर्तनावरून पॅरा जलतरणपटू मोहम्मद शम्स आलमला भारतात पाठवले

Google News Follow

भारतीय पॅरा जलतरणपटू मोहम्मद शम्स आलम शेख यांना जपानमध्ये २०२६ आशियाई पॅरा गेम्सदरम्यान एका महिला हॉटेल कर्मचाऱ्याशी कथित लैंगिक गैरवर्तन केल्याच्या आरोपानंतर जपानमधून भारतात परत पाठवण्यात आले आहे. या घटनेची अधिकृत माहिती गुरुवारी (२२ ऑक्टोबर) समोर आली. भारतीय पॅरालिम्पिक समितीने (PCI) ४० वर्षीय खेळाडूवर आजीवन बंदी घालण्याची शिफारस केली आहे.

या प्रकरणाची प्रत्यक्ष ठिकाणी हाताळणी करणाऱ्या समितीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी (१९ ऑक्टोबर) भारतीय पॅरा जलतरण संघाचा मुक्काम असलेल्या फोर पॉइंट्स बाय शेरेटन हॉटेलमध्ये घडली. हॉटेलमधील महिला हाउसकीपिंग कर्मचारी शेख यांच्या खोलीत आपल्या कामासाठी गेली होती. त्यावेळी शेख यांनी तिच्याशी कथितरित्या अयोग्य पद्धतीने स्पर्श केला, लैंगिक स्वरूपाचे हावभाव केले, तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे.

यानंतर या महिला कर्मचाऱ्याने केलेली तक्रार स्थानिक आयोजन समिती तसेच भारतीय प्रतिनिधी मंडळातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. तक्रार दाखल झाल्यानंतर जपानी पोलिसांनी शेख यांना ताब्यात घेतले आणि स्थानिक पोलीस ठाण्यात नेले. त्यांना औपचारिकरित्या अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा जपानी अधिकाऱ्यांचा सुरुवातीचा प्रयत्न होता.

हे ही वाचा:

दिल्लीत समाजविघातक लोकांनी एकत्र येऊन सरकार बदलत नसते!

तिघांच्या हत्येप्रकरणी दहशतवाद्याला दुहेरी जन्मठेप

सौरव दास, रांकाचा दिल्ली पोलिसांना ‘टाईम प्लीज’

शेअर बाजारात पुन्हा भूकंप!

मात्र, त्यानंतर स्थानिक आयोजन समितीने हस्तक्षेप केला. भारतीय प्रतिनिधी मंडळाला संबंधित हॉटेल कर्मचारी आणि हॉटेल व्यवस्थापनाची लेखी माफी मागण्यास सांगण्यात आले. तसेच शेख यांना जपान सोडण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले.

त्या रात्री शेख याला दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर नागोया येथून भारताकडे जाणाऱ्या उपलब्ध पहिल्याच विमानाचे तिकीट त्यांच्यासाठी निश्चित करण्यात आले. कथित घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी, मंगळवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे २ वाजता त्यांनी नागोयाहून जपान सोडले.

भारतीय प्रतिनिधी मंडळाने हॉटेल व्यवस्थापन तसेच संबंधित महिला कर्मचाऱ्याची लेखी माफी मागितली. समितीच्या एका अधिकाऱ्याने या घटनेचे वर्णन “निंदनीय आणि असह्य” असे केले. देशाचे परदेशात प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूकडून अशा वर्तनाचे “कोणतेही समर्थन होऊ शकत नाही”, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा