31 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरस्पोर्ट्सकसोटी क्रिकेटला मोहम्मद शमीचा अलविदा!

कसोटी क्रिकेटला मोहम्मद शमीचा अलविदा!

Google News Follow

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने आपल्या निर्णयाची माहिती दिली. भारताची पांढरी जर्सी सोडत असलो, तरी त्याच्याशी जोडलेल्या आठवणी आयुष्यभर सोबत राहतील, अशा भावनिक शब्दांत शमीने कसोटी क्रिकेटला निरोप दिला.

शमीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, भारताची कसोटी जर्सी पहिल्यांदा परिधान केली, तेव्हा देशासाठी काहीतरी करून दाखवण्याचे स्वप्न होते. या प्रवासात मिळालेली प्रत्येक विकेट, संघर्ष, दुखापत आणि पुनरागमन याने खूप काही शिकवले. कसोटी क्रिकेट हा केवळ एक प्रकार नसून आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे असंख्य सुंदर आठवणी मनात साठवून जड अंतःकरणाने निवृत्तीचा निर्णय घेत असल्याचे त्याने सांगितले.

या प्रवासात साथ देणारे सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, कुटुंबीय, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल आणि चाहत्यांचेही शमीने आभार मानले. मैदानावर शेवटचा कसोटी चेंडू टाकला असला, तरी भारतासाठी खेळण्याचा अभिमान कायम हृदयात जिवंत राहील, अशी भावनिक प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.

३६ वर्षीय शमीला गेल्या काही काळापासून भारतीय संघात संधी मिळाली नव्हती. त्याने मार्च २०२५ मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तर जून २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो अखेरच्या वेळी कसोटी सामन्यात उतरला होता.

नोव्हेंबर २०१३ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या शमीने आपल्या कारकिर्दीत ६४ कसोटी सामने खेळले. यात २७.७१ च्या सरासरीने त्याने २२९ बळी घेतले. सहा वेळा एका डावात पाच बळी घेण्याची कामगिरीही त्याने केली. फलंदाजीत ७५० धावा करताना दोन अर्धशतके झळकावली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०८ सामन्यांत २०६, तर २५ टी-२० सामन्यांत २७ बळी त्याच्या नावावर आहेत.

भारतीय वेगवान गोलंदाजीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या शमीच्या कसोटी कारकिर्दीचा अखेर पडदा पडला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा