31 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरक्राईमनामालोकलमध्ये हाणामारी; प्रवासी धावत्या ट्रेनमधून पडला

लोकलमध्ये हाणामारी; प्रवासी धावत्या ट्रेनमधून पडला

दरवाजात उभे राहण्यावरून वाद

Google News Follow

मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीदरम्यान एक प्रवासी धावत्या ट्रेनमधून खाली पडला. गुरुवारी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला.

माहितीनुसार, लोकलच्या दरवाजात उभे राहण्यावरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोघांमधील मारहाणीमुळे डब्यात गोंधळ निर्माण झाला. याचदरम्यान एका प्रवाशाचा तोल जाऊन तो चालत्या लोकलमधून खाली पडला. मात्र, लोकल मुंबई सेंट्रल स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून जात असताना तिचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळल्याचे वृत्त आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे ही वाचा:

अरुणाचल प्रदेशात ४५८ एकरवरील गांजाची अवैध शेती उद्ध्वस्त

कर्नाटकात आलेल्या केरळमच्या बसवर दाऊदचा उदोउदो!

बिश्नोई टोळीचा सदस्य हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक

शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा