29.7 C
Mumbai
Sunday, November 1, 2026
घरस्पोर्ट्सभारताने पाचवा सामनाही गमावला, पण मालिका जिंकली!

भारताने पाचवा सामनाही गमावला, पण मालिका जिंकली!

सीफर्ट-फिलिप्सची तुफानी फलंदाजी; न्यूझीलंडचा दुसऱ्या सामन्यात विजय

Google News Follow

न्यूझीलंडने शानदार कामगिरी करत पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारताचा ७ विकेट्सनी पराभव केला. भारतीय संघाने दिलेले १९२ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने अवघ्या १८ षटकांत ३ विकेट्स गमावून सहज पूर्ण केले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. फिन ॲलन अवघ्या २ धावा करून अर्शदीप सिंहच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर टिम सीफर्टने डॅरिल मिचेलच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ४२ चेंडूंत ७३ धावांची भागीदारी केली. मिचेल १६ चेंडूंत २९ धावा करून बाद झाला. सीफर्ट मात्र शानदार लयीत दिसला. त्याने ३४ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने याआधीचा चौथा सामनाही गमावला होता. पण त्याआधीच सलग तीन सामने जिंकून मालिका खिशात घातली होती.

या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा ग्लेन फिलिप्स सीफर्टच्या साथीला आला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या ४२ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी केली. सीफर्टला शतक पूर्ण करता आले नाही. तो ५० चेंडूंत ९३ धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने ११ चौकार आणि ५ षटकार लगावले.

दुसरीकडे, फिलिप्सने या मालिकेतील आपले चौथे अर्धशतक झळकावले. तो ३८ चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६५ धावा करून नाबाद राहिला. त्याने बेवन जेकब्सच्या साथीने (नाबाद १ धाव) न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. भारताकडून गोलंदाजी करताना वरुण चक्रवर्ती, नितीश कुमार रेड्डी आणि अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हे ही वाचा:

दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेचा धोका १० टक्क्यांवरून ३५ टक्क्यांवर

वाळवंटातल्या ‘हिरवळी’चा धडा

उत्तर प्रदेशातील किंग जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालयात लव्ह जिहाद, धर्मांतरण, शोषण

जुरेलच्या शतकामुळे भारत ‘अ’च्या ३४६ धावा

भारताची फलंदाजी १९१ धावांवर आटोपली

तत्पूर्वी, भारतीय संघाने २० षटकांत ८ विकेट्स गमावून १९१ धावा केल्या. भारताची सुरुवात निराशाजनक झाली. अभिषेक शर्मा (१ धाव) आणि संजू सॅमसन (४ धावा) स्वस्तात माघारी परतले. मात्र, त्यानंतर इशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या ४३ चेंडूंत ९३ धावांची आक्रमक भागीदारी केली.

इशान किशन ३२ चेंडूंत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६१ धावा करून बाद झाला. तर श्रेयस अय्यरने २३ चेंडूंत ५० धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकार लगावले. तिलक वर्माला केवळ ६ धावा करता आल्या. नमन धीरने २३ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३३ धावा केल्या. नितीश कुमार रेड्डी १७ चेंडूंत २२ धावा करून ॲडम मिल्नेच्या गोलंदाजीवर बाद झाला. भुवनेश्वर कुमारने ६ धावा केल्या.

न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना ॲडम मिल्नेने ४ षटकांत केवळ १९ धावा देत ४ विकेट्स मिळवल्या. नॅथन स्मिथ आणि ब्लेक टिकनर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. पाचव्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला असला, तरी भारतीय संघाने ही टी-२० मालिका ३-२ अशी जिंकत आपल्या नावावर केली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा