32 C
Mumbai
Saturday, October 10, 2026
घरस्पोर्ट्सनेमार पुन्हा मैदानात; ब्राझीलच्या आशा उंचावल्या

नेमार पुन्हा मैदानात; ब्राझीलच्या आशा उंचावल्या

Google News Follow

Related

फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेत ब्राझील संघासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. स्टार फुटबॉलपटू नेमार दुखापतीतून सावरल्यानंतर पुन्हा संघासोबत पूर्ण सरावात सहभागी झाला असून स्कॉटलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

सँटोस क्लबकडून खेळणारा ३४ वर्षीय नेमार स्पर्धेपूर्वी ग्रेड-२ काफ स्ट्रेन या दुखापतीमुळे त्रस्त होता. त्यामुळे त्याला स्पर्धेतील सुरुवातीचे दोन सामने मुकावे लागले. गेल्या आठवड्यात त्याने हलका सराव सुरू केला होता. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नेमारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर सरावाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत, “देवाचे आभार, मी खूप आनंदी आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.

ब्राझीलचे प्रशिक्षक कार्लो अँसेलोटी यांनी नेमार दुखापतीतून पूर्णपणे बरा झाल्याचे सांगितले. मियामी येथे बुधवारी होणाऱ्या स्कॉटलंडविरुद्धच्या ग्रुप ‘सी’मधील अखेरच्या सामन्यासाठी त्याचा संघात समावेश केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ब्राझीलचा मिडफिल्डर लुकास पाक्वेटा म्हणाला, “नेमारच्या पुनरागमनामुळे आम्ही सर्वजण आनंदी आहोत. राष्ट्रीय संघासाठी त्याचे योगदान मोठे आहे. त्याचा अनुभव आणि गुणवत्ता संघासाठी महत्त्वाची ठरणार आहे.”

नेमार हा ब्राझीलचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. त्याने राष्ट्रीय संघासाठी १२८ सामन्यांत ७९ गोल नोंदवले आहेत. ऑक्टोबर २०२३ मध्ये गंभीर गुडघ्याच्या दुखापतीनंतर तो बराच काळ राष्ट्रीय संघाबाहेर होता.

दरम्यान, विश्वचषक २०२६ हा आपल्या कारकिर्दीतील अखेरचा विश्वचषक ठरू शकतो, असे संकेत नेमारने यापूर्वी दिले होते. फिफाच्या एका पोस्टवर त्याने “द लास्ट डान्स” अशी प्रतिक्रिया दिली होती.

ग्रुप ‘सी’मध्ये ब्राझीलचे ४ गुण असून संघ अव्वल स्थानावर आहे. मोरोक्कोचेही ४ गुण आहेत, मात्र गोलफरकाच्या जोरावर ब्राझील आघाडीवर आहे. स्कॉटलंड ३ गुणांसह तिसऱ्या, तर हैती शून्य गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे बाद फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी ब्राझीलसाठी स्कॉटलंडविरुद्धचा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा