34 C
Mumbai
Friday, February 6, 2026
घरस्पोर्ट्सभारतीय बॅडमिंटनसाठी ‘सुवर्णक्षण’

भारतीय बॅडमिंटनसाठी ‘सुवर्णक्षण’

जेव्हा सायना नेहवालने दुसऱ्यांदा जिंकली ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज

Google News Follow

Related

१२ जून हा दिवस भारतीय क्रीडा क्षेत्रात ‘सुवर्ण दिन’ म्हणून ओळखला जातो. कारण, याच दिवशी २०१६ साली भारताची स्टार शटलर सायना नेहवाल हिने आपल्या खेळाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की ती सर्वोत्तम आहे. सायनाने याच दिवशी आपलं दुसरं ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज विजेतेपद आपल्या नावावर केलं.

हे तिचं या स्पर्धेतील पहिलं विजेतेपद नव्हतं. याआधी २०१४ मध्ये देखील तिने ही स्पर्धा जिंकली होती. पण दुसऱ्यांदा हे यश मिळवत तिने आपल्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केलं.

सायनाने याआधी सुन यू या खेळाडूविरुद्ध सहापैकी पाच सामने जिंकले होते. पण या सुपर सिरीजच्या अंतिम फेरीत सुन यू ही सायनाला सहज हार मानणारी नव्हती.

फायनलच्या पहिल्या गेममध्ये सायनाची खेळी काहीशी विस्कळीत होती. काही चुकांमुळे सुन यूने पहिला गेम २१-११ ने जिंकला.

पण सायनाने हार मानली नाही. दुसऱ्या गेममध्ये ती पूर्णपणे बदलेली वाटली. उत्कृष्ट पुनरागमन करत तिने दुसरा गेम २१-१४ ने जिंकला.

तिसरा गेम मात्र थरारक ठरला. दोन्ही खेळाडूंमध्ये गुणांसाठी चुरस होती. पण अखेर सायनाने हा निर्णायक गेम २१-१९ ने जिंकून सामना आणि विजेतेपद दोन्ही आपल्या नावावर केलं.

२०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर सायनाचं हे आणखी एक मोठं यश ठरलं. त्यानंतर २०१७ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ, आणि २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये दोन सुवर्णपदकं मिळवली.

सायना ही कॉमनवेल्थ गेम्सच्या महिला सिंगल्समध्ये दोन सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय शटलर ठरली. २०१८ मध्ये एशियन चॅम्पियनशिप आणि एशियन गेम्समध्ये कांस्य पदकही जिंकलं.

१७ मार्च १९९० रोजी हिसारमध्ये जन्मलेली सायना नेहवाल ही ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. २००८ मध्ये वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप आणि २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सहभाग, पण पहिलं ऑलिम्पिक पदक २०१२ मध्ये मिळालं.

सायनाने २००८, २०१२ आणि २०१६ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. पण २०२३ च्या सिंगापूर ओपननंतर तिने कोणतीही स्पर्धा खेळलेली नाही.

२०२४ मध्ये तिने सांगितलं की अर्थरायटिसमुळे ती निवृत्तीचा विचार करत आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

तिच्या उत्कृष्ट कारकिर्दीसाठी तिला अर्जुन पुरस्कार (२००९), पद्मश्री (२०१०) आणि पद्म भूषण (२०१६) या सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा