30.1 C
Mumbai
Wednesday, May 14, 2025
घरस्पोर्ट्सपंतभाई, धोनीला कॉल करा...

पंतभाई, धोनीला कॉल करा…

Google News Follow

Related

एकेकाळचा मैदानावरचा वाघ… आता मात्र आपल्या फॉर्मसाठी झगडतोय! ऋषभ पंत — ज्याच्याकडे एकेकाळी भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा असेल असा विश्वास होता, तो आज आयपीएल 2025 मध्ये चाचपडतोय. आणि अशा वेळी भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं त्याला दिलेली सल्ल्याची गोष्ट सर्वांचं लक्ष वेधून घेतेय.

सेहवाग म्हणतो, “त्याच्याकडे मोबाइल आहे ना? मग फोन उचला आणि कॉल करा!”
पंतचे आदर्श म्हणजे महेंद्रसिंह धोनी. त्याच धोनीला एक फोन केल्यानं पंतच्या मनातली काळजी हलकी होऊ शकते, असं सेहवागचं ठाम मत आहे.

काय आहे पंतचा हंगामातला फॉर्म?

27 कोटींचा सगळ्यात महागडा खेळाडू म्हणून खरेदी झालेला पंत, या हंगामात 10 डावांत केवळ 128 धावा… पाच वेळा सिंगल डिजिट स्कोअर, एक शून्य, आणि फक्त एक अर्धशतक!
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यातही तो 18 धावांवर बाद झाला आणि एलएसजीला 37 धावांनी पराभव पत्करावा लागला.

सेहवागचा दुसरा सल्ला – स्वतःचाच जुना खेळ बघ!

सेहवाग म्हणतो, “2006/07 मध्ये मी सुद्धा संघर्ष करत होतो. राहुल द्रविडने मला सांगितलं – तू जेव्हा चांगला खेळायचास तेव्हाचे व्हिडिओ पुन्हा बघ. त्यातून आत्मविश्वास परत येतो.”

त्याने पंतला स्पष्टपणे सांगितलं, “चूक कुठे होतेय, हे कळायला सुरुवात जुन्या दिनचर्येपासून करावी लागते.”
ऋषभ पंत सध्या जो खेळतोय, तो पूर्वीच्या जोशातल्या पंतपेक्षा वेगळा वाटतो, असंही तो म्हणाला.

धोनी – एक कॉल, एक दिशा

एम.एस. धोनी… शांत, संयमी, पण अत्यंत प्रभावी. अशा वेळेस पंतला त्याचं मार्गदर्शन मिळणं म्हणजे अंधारात दिशा दाखवणारा दीपस्तंभच ठरेल. सेहवागचं मत अगदी सोपं आहे – “फोन कर! मन मोकळं कर! आणि पुन्हा उभा राहा!”


चक दे पंत! एक फोन, एक आठवण, एक नवा आरंभ… अजूनही वेळ गेलेली नाही!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
248,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा