25 C
Mumbai
Thursday, December 25, 2025
घरस्पोर्ट्सप्रभसिमरनचा भडिमार, लखनऊ तडीपार!

प्रभसिमरनचा भडिमार, लखनऊ तडीपार!

Google News Follow

Related

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या धर्मशाला स्टेडियममध्ये रविवारी एक थरारक सामना रंगला. आयपीएल २०२५ च्या ५४व्या सामन्यात पंजाब किंग्जने लखनऊ सुपर जायंट्सला तब्बल ३७ धावांनी हरवत आपल्या विजयाचा डंका वाजवला. पण या विजयामागे होता एकच हिरो – प्रभसिमरन सिंग!

प्रभसिमरनने ९१ धावांची जळजळीत खेळी करत लखनऊसमोर २३७ धावांचं डोंगर उभं केलं. ७ षटकार आणि ६ चौकारांच्या आतषबाजीत त्याने मैदानात आगीचे फवारे उडवले.

पंजाबची सुरुवात फारशी चांगली नव्हती. पहिल्याच ओव्हरमध्ये प्रियांश आर्या बाद झाला. पण मग मैदानात आला प्रभसिमरन – आणि त्याच्यासोबत जॉश इंग्लिस! इंग्लिसने १४ चेंडूत ३० धावा करत सूर गवसवला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने २५ चेंडूत ४५ धावा करत प्रभसिमरनसोबत मोठी भागीदारी उभी केली.

१९व्या ओव्हरपर्यंत प्रभसिमरननं तुफान माजवलं. त्याचं शतक थोडक्यात हुकलं, पण त्याने संघाला दिलेलं बळ अमूल्य ठरलं.

शेवटी शशांक सिंगच्या नाबाद ३३ (१५ चेंडू), नेहाल वढेराच्या १६ आणि स्टोइनिसच्या १५ धावांच्या छोट्या पण उपयुक्त खेळीमुळे पंजाबने २३६/५ असा डोंगरासारखा स्कोअर उभारला.

लखनऊच्या गोलंदाजांनी अक्षरशः घाम गाळला. आकाश महाराज सिंगने ४ ओव्हरमध्ये फक्त ३० धावा देत २ बळी घेतले आणि थोडीशी धूजारी दिली. पण मयंक यादवचा दिवस खराब गेला – ४ ओव्हरमध्ये ६० धावा खर्च केल्या!

लखनऊने या आव्हानाला सामोरे जाताना सुरूवातीलाच गडगड केली. पॉवरप्लेमध्ये ३ बळी गेल्यावर सामना हातातून निसटला. आयुष बडोनी (७४ धावा, ४० चेंडू) आणि अब्दुल समद (४५ धावा, २४ चेंडू) यांनी थोडी झुंज दिली. पण कप्तान ऋषभ पंत पुन्हा फ्लॉप – फक्त १८ धावा!

हेही वाचा :

देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास

परदेशी चित्रपट ‘राष्ट्रीय सुरक्षेला धोका’ म्हणून डोनाल्ड ट्रम्पकडून १०० टक्के टॅरिफ

गाडी नवी, अदा तीच!

सिंधुदुर्ग दोडामार्गला घराच्या परवान्यावर उभारला मदरसा, केला जमीनदोस्त!

अखेरीस, लखनऊने २० ओव्हरमध्ये १९९/७ धावा केल्या आणि सामना ३७ धावांनी गमावला.

पंजाबकडून अर्शदीप सिंग चमकला – ३ विकेट्स! अजमतुल्लाह ओमरजईला २, तर मार्को यान्सन आणि युजवेंद्र चहलला प्रत्येकी एक विकेट मिळाली.


📌 मॅचचा हिरो: प्रभसिमरन सिंग – ९१ धावा, ७ षटकार, ६ चौकार

🔥 पंजाब पुन्हा स्पर्धेत जोमात!

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा