32 C
Mumbai
Monday, May 19, 2025
घरविशेषसिंधुदुर्ग दोडामार्गला घराच्या परवान्यावर उभारला मदरसा, केला जमीनदोस्त!

सिंधुदुर्ग दोडामार्गला घराच्या परवान्यावर उभारला मदरसा, केला जमीनदोस्त!

स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या मागणीनंतर कारवाई 

Google News Follow

Related

सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी इथल्या अनधिकृत मदरशावर बुलडोजर चालवण्यात आला आहे. घराचा परवाना घेवून हा मदरसा उभारण्यात आला होता. या अनधिकृत मदरशामध्ये दोन तलवारी आढळून आल्याचे नुकतेच समोर आले होते. आज (५ मे) अखेर पोलीस बंदोबस्तात हा अनधिकृत मदरसा जमीनदोस्त करण्यात आला.

मिळालेल्या महितीनुसार, गेली चार याठिकाणी मदरसा चालवला जात होता. स्थानिक ग्रामपंचायतीकडून घरासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र, ग्रामपंचायतीने ती नाकारली. ग्रामपंचायतीने नकार देवून देखील याठिकाणी इमारत बांधून त्यामध्ये मदरसा चालवला जात होता. अनधिकृत मदरसामध्ये शेख बिलाल आलम आणि अस्लम ईस्माईल खेडेकर हे मिळून सात ते दहा वयोगटातील लहान मुलांना उर्दू व अरबी शिक्षण देत होते. या शिक्षण संस्थेसाठी कोणतीही कायदेशीर परवानगी घेण्यात आलेली नव्हती.

या अनधिकृत मदरसामुळे स्थानिक नागरिकांना या ठिकाणी अनेक अडचणी येत होत्या. याठिकाणी जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. अखेर या गोष्टीची माहिती स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यानंतर अनधिकृत मदरशावर तोडक कारवाई करण्यात आली.

हे ही वाचा : 

बलुचिस्तान टाईम्स आणि बलुचिस्तान पोस्ट या न्यूज पोर्टलचे एक्स अकाउंट भारतात ब्लॉक!

अश्लील शो करणाऱ्या एजाज खानवर बलात्काराचा गुन्हा!

हरयाणात काँग्रेसचे माजी आमदार धर्मसिंग छोक्कर अटकेत!

दहशतवाद्यांशी संबंधावरून ताब्यात घेतलेला तरुण गेला वाहून

पोलिसांच्या तपासात या अनधिकृत मदरसामध्ये नुकत्याच दोन तलवारी सापडल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली होती. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

या घटनेनंतर स्थानिक हिंदू संघटनांनी मागणी केली आहे की, सदर अनधिकृत मदरसाची इमारत जमीनदोस्त करावी. तसेच, दोडामार्ग परिसरात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची कसून चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली. या प्रकरणी अखेर प्रशासनाने कारवाई करत अनधिकृत मदरसा जमीनदोस्त केला आणि आता पुढील कारवाई सुरु आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
249,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा