30.3 C
Mumbai
Tuesday, November 3, 2026
घरस्पोर्ट्सरोहित-विराटची कीवी गोलंदाजांना डोकेदुखी!

रोहित-विराटची कीवी गोलंदाजांना डोकेदुखी!

Google News Follow

भारताविरुद्धच्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेपूर्वी न्यूझीलंडने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. भारतीय फलंदाजीचा कणा असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना सामन्याच्या सुरुवातीच्या षटकांतच बाद करण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असेल, असे कर्णधार मिचेल सॅंटनरने सांगितले. या दोन्ही अनुभवी फलंदाजांना मोठी खेळी करण्यापासून रोखणे हे न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोरील प्रमुख आव्हान असणार आहे.

मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सॅंटनर म्हणाला, “प्रत्येक सामन्यात सुरुवातीलाच त्यांना रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. भारतीय संघाची आघाडीची फळी आम्ही बऱ्याच काळापासून पाहत आलो आहोत. रोहित आणि विराट सुरुवातीला आक्रमक फलंदाजी करतात. त्यानंतर डावाला आकार देत अखेरच्या टप्प्यात मोठ्या फटक्यांच्या जोरावर धावांचा वेग वाढवतात.”

या दोन्ही फलंदाजांना रोखण्यासाठी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळेल, अशी सॅंटनरला अपेक्षा आहे. न्यूझीलंडच्या परिस्थितीनुसार गोलंदाजीची दिशा आणि रणनीती कशी असावी, याबाबत संघात चर्चा झाल्याचेही त्याने सांगितले.

रोहित आणि विराट यांच्या अनुभवाचे आणि सातत्यपूर्ण कामगिरीचे सॅंटनरने कौतुक केले. वय वाढत असतानाही दोन्ही फलंदाज उत्तम कामगिरी करत असल्याचे त्याने नमूद केले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्यांची कामगिरी पाहिल्याचे सांगत आयपीएलमधील रोहितच्या खेळाचाही त्याने उल्लेख केला.

दरम्यान, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी हा न्यूझीलंडचा संभाव्य अखेरचा दौरा ठरू शकतो. त्यामुळे या दोन्ही दिग्गजांना मैदानावर खेळताना पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांसह न्यूझीलंडमधील क्रिकेटप्रेमीही उत्सुक आहेत. बुधवारपासून सुरू होणाऱ्या मालिकेत न्यूझीलंडची रणनीती यशस्वी ठरते की रोहित-विराटची बॅट पुन्हा तळपते, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा