28.3 C
Mumbai
Tuesday, July 21, 2026
घरस्पोर्ट्सक्रिकेटच्या पंढरीत 'हिटमॅन'ची विक्रमी वारी!

क्रिकेटच्या पंढरीत ‘हिटमॅन’ची विक्रमी वारी!

Google News Follow

Related

भारताचा कर्णधार रोहित शर्माने लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची जादू दाखवत इतिहास रचला. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने १३८ धावांची तडाखेबंद खेळी करत इंग्लंडच्या भूमीवरील भारत-इंग्लंड वनडे मालिकेत भारतीय फलंदाजाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. विशेष म्हणजे, हा विक्रम त्याने स्वतःच्याच आठ वर्षांपूर्वीच्या १३७* धावांच्या विक्रमाला मागे टाकत केला.

इंग्लंडने दिलेल्या ३८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहितने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. त्याने १७ चौकार आणि ५ षटकारांच्या जोरावर १३८ धावांची शानदार खेळी साकारली. २०१७ मध्ये ट्रेंट ब्रिज येथे केलेल्या नाबाद १३७ धावांचा विक्रम आता इतिहासजमा झाला.

रोहितला सलामीवीर शुभमन गिलचीही उत्कृष्ट साथ लाभली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १४७ धावांची भागीदारी रचत भारताला दमदार सुरुवात करून दिली. गिलने ७७ धावांचे योगदान दिले. त्यानंतर विराट कोहलीसोबत रोहितने दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी करत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. कोहलीने ६० चेंडूत ७४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांतील अपयशानंतर रोहितच्या फॉर्मवर उपस्थित झालेल्या प्रश्नांना त्याने आपल्या बॅटमधूनच चोख उत्तर दिले. मात्र, त्याची ही ऐतिहासिक खेळीही भारताला विजय मिळवून देऊ शकली नाही.

३८८ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ५० षटकांत ७ बाद ३६० धावा केल्या आणि २७ धावांनी सामना गमावला. ईशान किशन (१४), श्रेयस अय्यर (०), के. एल. राहुल (१२) आणि अक्षर पटेल (२) यांना अपेक्षित योगदान देता आले नाही.

याआधी इंग्लंडने ५० षटकांत ३ बाद ३८७ धावांचा डोंगर उभा केला. बेन डकेटने १४१ धावांची दमदार खेळी केली, तर जेकब बेथेलने ९१ धावा केल्या. जो रूट ७४ धावांवर नाबाद राहिला, तर जोस बटलरने अवघ्या १३ चेंडूत ४१ धावांची तुफानी खेळी करत इंग्लंडला भक्कम धावसंख्या उभारून दिली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा