रायपूरमध्ये मुंबई इंडियन्स आणि आरसीबीच्या सामन्यापूर्वी एक भन्नाट प्रसंग घडला आणि त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कारण विषय होता — रोहित शर्मा आणि एका महिला फॅनची “सेल्फी स्टोरी”!
मुंबई इंडियन्सची टीम हॉटेलमधून बसकडे जात असताना रोहित शर्मा दिसताच चाहत्यांची गर्दी उसळली. त्यात एक महिला फॅन तर अक्षरशः धावतच रोहितजवळ पोहोचली. चेहऱ्यावर प्रचंड उत्साह… तोंडातून सतत “रोहित… रोहित…” आणि हातात सेल्फीसाठी फोन!
महिला फॅनने रोहितला पाहताच आनंदाने म्हटलं,
“यू आर द बेस्ट!”
रोहितही नेहमीप्रमाणे शांत आणि हसतमुख अंदाजात चाहत्यांना प्रतिसाद देत होते. पण पुढे जे झालं ते पाहून आसपासचे सगळेच हसू लागले!
महिला सेल्फी घेण्यासाठी फोन सुरू करते… पण नेमकं त्याच वेळी फोन बंद!
ती घाबरून म्हणाली,
“मेरा फोन ऑफ हो गया…”
तोपर्यंत रोहित पुढे निघाले होते. पण फॅन हार मानणाऱ्यांपैकी नव्हती! तिने लगेच दुसरा फोन मागवला आणि रोहितच्या मागे धावत जाऊन म्हणाली,
“रुक जाइए… मेरा फोन बंद हो गया था!”
यावर रोहित शर्माने दिलेलं उत्तर आता सोशल मीडियावर सुपरहिट ठरतंय. रोहित मिश्कीलपणे म्हणाले,
“तो अभी क्या करूं मैं? जल्दी करो मैडम!”
हे ऐकताच आसपास एकच हशा पिकला. शेवटी त्या फॅनने दुसऱ्या फोनवर रोहितसोबत सेल्फी घेतली आणि तिचा आनंद तर गगनात मावेना!
दरम्यान, दुखापतीनंतर मैदानात पुनरागमन केलेल्या रोहित शर्माने लखनौविरुद्धच्या सामन्यात ४४ चेंडूत ८४ धावांची तुफानी खेळी करत फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत. आता आरसीबीविरुद्धही “हिटमॅन शो” पाहायला मिळणार का, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे







