29 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरस्पोर्ट्सनवोदित मुंबई श्रीचा विजेता साजिद मलिक

नवोदित मुंबई श्रीचा विजेता साजिद मलिक

नवोदितांच्या स्पर्धेला खेळाडूंचा विक्रमी सहभाग

Google News Follow

Related

नवोदित मुंबई श्रीच्या निमित्ताने गोरेगावचे शास्त्रीनगर मैदान शरीरसौष्ठवपटू आणि क्रीडाप्रेमींच्या गर्दीने ओसंडून वाहत होते. रात्री अकरा वाजता नवोदित मुंबई श्रीचा मान विराज फिटनेसच्या साजिद मलिकने मिळवला.

नवोदित मुंबई श्रीच्या आयोजनाचा दिवस शरीरसौष्ठव स्पर्धेचा इतिहासात संस्मरणीय ठरला. नवोदित मुंबई श्रीसारख्या जिल्हास्तरीय आणि नवख्या आणि उदयोन्मुख खेळाडूंच्या स्पर्धेला दीडशे स्पर्धकांची अपेक्षा असताना प्रत्यक्षात २३५ पीळदार नवोदितांचा सहभाग थक्क करणारा होता.

स्पर्धकांच्या आणि प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे शास्त्रीनगर मैदान फारच छोटे वाटू लागले होते. सात वजनी गटाच्या या स्पर्धेत २३५ शरीरसौष्ठवपटूंच्या सहभागामुळे स्पर्धा काहीकाळ लांबली. सर्वात आश्चर्याचे म्हणजे स्पर्धेत खेळाडूंची संख्या अनपेक्षितपणे वाढली तरी स्पर्धेचा दर्जा फारच उंचावलेला दिसला.

हे ही वाचा:

काँग्रेसने गाठली नवी नीचतम पातळी, पंतप्रधान मोदींचा केला व्हीडिओ शेअर

‘हिटमॅन’ रोहित शर्माला हवेत आणखी ५ षटकार

मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट

घरीच बनवा व्हेज सूप पावडर

स्पर्धा तासभर उशीरा सुरू झाली, तरीही शरीरसौष्ठव संघटनेच्या पदाधिकारी आणि पंचांनी नवोदित मुंबई श्रीचा फैसला वेळेतच लावला. प्रत्येक गटात ४०-४५ खेळाडू तर ६० किलो आणि ६५ किलो वजनीगटात स्पर्धकांच्या संख्येने अर्धशतक ओलांडले होते. या प्रचंड संख्येमुळे टॉप फाइव्ह निवडताना पंचांची चांगलीच पंचाईत झाली. ५५ किलो वजनी गटात इतकी चुरस होती की, अव्वल पाच खेळाडू निवडताना जजेसना तीन-तीनदा या खेळाडूंची एकमेकांशी तुलना करावी लागली.  दर्शन सावंत आणि अर्णव वाघ या जोडीला मागे टाकत बोवलेकर जिमचा रमण राठोड सरस ठरला. ६० किलो वजनी गटात धर्मराज जमादारने बाजी मारली. ६५ किलोमध्ये प्रतिक महाजन, ७० किलोत खुद्द साजिद मलिक आणि ७५ किलोवरील वजनी गटात परब फिटनेसचा फ्रान्सिसको फर्नांडिस अव्वल आला. ७० किलो वजनी गटात अमन भौमिकवर मात करत गटात पहिला आलेला साजिद मलिकच स्पर्धेचा विजेता ठरला.

स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजक अजय विचारे, शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, विशाल परब, सुनील शेगडे, किरण कुडाळकर, राजेश निकम, राकेश पांडे, जयदीप पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. तर नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरता विक्रांत देसाई निलेश दगडे, उमेश गुप्ता, हर्मीत सिंग, संदीप सावळे, मनोज बोचरे, संतोष भरणकर, विशाल धावडे यांसारखे वरिष्ठ शरीरसौष्ठवपटू उपस्थित होते.

नवोदित मुंबई श्री २०२५ स्पर्धेचा निकाल

५५ किलो वजनी गट : १. रमण राठोड (बोवलेकर जिम), २. दर्शन सावंत (जय भवानी जिम), ३.अर्णव वाघ (जेडी फिटनेस), ४. अनिकेत कदम (परब फिटनेस), ५. सोयल मोहम्मद (बाबा फिटनेस).
६० किलो वजनी गट : १. धर्मराज जमादार (एम जे ५२ फिटनेस), २. निशांत नांदिवडेकर (श्री दत्तगुरु जिम) ३. रितिक वेरुळकर (पॉवर पॉइंट जिम), ४. चेतन सुतार (श्रीराम जिम), ५. ओम मिस्त्री (बोवलेकर जिम).
६५ किलो वजनी गट : १. प्रतिक महाजन (विराज फिटनेस), २. संकेत शिगवण (फिट अँड फाईन), ३. निखिल सावंत (आय क्यू फिटनेस), ४) ब्रॅण्डन डिसूजा (परब फिटनेस), ५. भावेश भंगेरा (शोयब जिम)
७० किलो वजनी गट : १. साजिद मलिक( विराज फिटनेस), २. अमन भौमिक ( बॉडी वर्कशॉप), ३. अनिकेत राठोड (कृष्णा जिम), ४. हिमांशू मकवाना (बॉडी वर्कशॉप), ५. रोहन मंगेला (पालकर जिम).
७५ किलो वजनी गट : १.हरीश साळुंखे (परब फिटनेस), २. सुरेंद्र नाईक (परब फिटनेस), ३. मनोज माळी (बॉडी वर्कशॉप), ४. सचिन राणे (जय भवानी जिम), ५. पंकज कुमार (पी आर पॉवर फिटनेस).
८० किलो वजनी गट : १. फ्रान्सिसको फर्नांडिस (सावरकर जिम). २. रहमतुल्लाह ( आदियांश जिम), ३. शुभम ठाकरे (शिवशक्ती जिम), ४. रितिक पालव (बॉडी वर्कशॉप), ५. पवन डंबे (श्री दत्तगुरु जिम).

८० किलोवरील वजनी गट : १. तुषार वाघ ( एज फिटनेस), २. सय्यद फकरुद्दीन (बालमित्र जिम), ३. जमालुद्दीन सय्यद (आर्यन पॅराडाइज), ४. अजय कुमार वर्मा (आर्यन पॅराडाइज), ५. रियान कोळी ( श्री गुरुदत्त जिम).

नवोदित मुंबई श्री : साजिद मलिक (विराज फिटनेस)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा