31 C
Mumbai
Friday, October 2, 2026
घरस्पोर्ट्सश्री चरणीची विक्रमी कामगिरी

श्री चरणीची विक्रमी कामगिरी

Google News Follow

Related

महिला आशिया कपमध्ये भारतीय महिला संघाची विजयी घोडदौड सुरूच आहे. हाँगकाँगचा १३७ धावांनी धुव्वा उडवत भारताने सलग दुसरा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. या सामन्यात स्मृती मानधनाच्या शतकासोबतच श्री चरणीनेही विक्रमी कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १९३ धावा केल्या. प्रत्युत्तरात हाँगकाँगचा डाव १६.२ षटकांत ५६ धावांत आटोपला. श्री चरणीने ३.२ षटकांत १६ धावा देत २ विकेट्स घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

या दोन विकेट्ससह श्री चरणीने २०२६ मध्ये आतापर्यंत ३१ टी-२० विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-२० विकेट्स घेणाऱ्या भारतीय महिला गोलंदाजांच्या यादीत तिने दीप्ती शर्माला मागे टाकले. दीप्तीने २०२४ मध्ये ३०, तर २०२२ मध्ये २९ विकेट्स घेतल्या होत्या.

एका वर्षात सर्वाधिक टी-२० विकेट्स घेण्याचा भारतीय महिला विक्रम पूनम यादवच्या नावावर आहे. पूनमने २०१८ मध्ये ३५ विकेट्स घेतल्या होत्या. श्री चरणीला हा विक्रम मोडण्यासाठी आता फक्त ५ विकेट्सची गरज आहे.

आशिया कपमधील आगामी सामन्यांमध्ये चरणीला हा विक्रम मोडण्याची संधी मिळू शकते.

दरम्यान, हाँगकाँगविरुद्ध स्मृती मानधनाने ६४ चेंडूंत १२४ धावांची वादळी खेळी केली. तिने १४ चौकार आणि ७ षटकार ठोकले. हे तिचे टी-२० क्रिकेटमधील दुसरे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १८वे शतक ठरले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा