30 C
Mumbai
Friday, September 11, 2026
घरस्पोर्ट्सकामगिरीवर लक्ष द्या, निवडकर्ते स्वतः शोधत येतील!

कामगिरीवर लक्ष द्या, निवडकर्ते स्वतः शोधत येतील!

सूर्यकुमार यादवचा युवा क्रिकेटपटूंना मंत्र

Google News Follow

Related

भारतीय टी-२० संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने युवा क्रिकेटपटूंना आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. इतर खेळाडूंशी तुलना न करता स्वतःच्या खेळात सातत्याने सुधारणा करा. तुमची कामगिरी चांगली असेल, तर निवडकर्ते स्वतः तुमचा शोध घेतील, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

आयएएनएसशी बोलताना सूर्यकुमार म्हणाला, “युवांनी स्वतःची तुलना इतर कोणाशीही करू नये. प्रत्येकाची कहाणी वेगळी असते आणि प्रत्येकाचा प्रवासही वेगळा असतो.”

आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळाची आठवण सांगताना सूर्यकुमारने देशांतर्गत क्रिकेट, ट्रेनचे प्रवास आणि भारतीय संघातील संधीची केलेली प्रतीक्षा याबद्दलही सांगितले.

‘वय नव्हे, तयारी महत्त्वाची!’

भारतीय क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंवर कमी वयातच मोठे यश मिळवण्याचा दबाव असतो. मात्र, वयामुळे खेळाडूचे भविष्य ठरत नाही, असे सूर्यकुमारने स्पष्ट केले.

“भारतात अनेकांना वाटते की २१ किंवा २५ वर्षांपर्यंत तुम्ही कुठे पोहोचला नाही, तर कारकीर्द संपली. पण वय हा आधार नाही; तुमची तयारी महत्त्वाची आहे,” असे तो म्हणाला.

युवांनी आपल्या कौशल्यावर सातत्याने काम करावे आणि कोणी पाहत नसतानाही मेहनत व प्रगतीशी प्रामाणिक राहावे, असे आवाहनही त्याने केले.

३१व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण

सूर्यकुमार यादवची कारकीर्दच युवा खेळाडूंसाठी मोठी प्रेरणा आहे. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर त्याला ३१व्या वर्षी भारतीय संघात संधी मिळाली.

टी-२० क्रिकेटमध्ये दीर्घकाळ जगातील क्रमांक एकचा फलंदाज राहिलेला सूर्यकुमार २०२४ चा टी-२० विश्वचषक खेळाडू म्हणून, तर २०२६ चा टी-२० विश्वचषक कर्णधार म्हणून जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग राहिला आहे.

संदेश स्पष्ट आहे—वयाची घाई नको, मेहनत आणि कामगिरीची साथ सोडू नका!

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
332,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा