भारत-पाकिस्तान दरम्यान शांततेचा करार होऊन काही तासही उलटले नाहीत, आणि पाकिस्तानने पुन्हा एकदा संघर्षविरामाचा भंग केला. जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमधील संवेदनशील भागांमध्ये पाकिस्तानी ड्रोनने घुसखोरी करत स्फोट घडवून आणल्याची माहिती मिळाली.
या प्रकारावर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने जोरदार प्रतिक्रिया दिली. आपल्या ‘एक्स’ (माजी ट्विटर) हँडलवर लिहिताना त्याने खवखवीत हिंदी म्हण वापरली – “कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच!“
ही म्हण सहसा ज्यांचं वागणं काही केल्या सुधारत नाही, अशा लोकांवर वापरली जाते. सेहवागचा हा टोला पाकिस्तानच्या वारंवार सीजफायर उल्लंघनावर रोख असलेला स्पष्ट संकेत मानला जात आहे.
सेहवाग, ज्याला ‘मुलतानचा सुलतान’ म्हणून ओळखलं जातं, त्याने मुलतानमध्ये आपल्या तिहेरी शतकामुळे इतिहास रचला होता. आणि आज त्याने त्या पाकिस्तानलाच शब्दांनी शह दिला.
दिवसाच्या सुरुवातीला भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही देशांनी अधिकृत संघर्षविरामाच्या करारावर सहमती दर्शवली होती. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केलं की, दोन्ही देशांच्या लष्करी संचालन महासंचालकांनी त्वरित प्रभावाने सर्व प्रकारच्या युद्धवृत्ती – जमिनीवर, आकाशात आणि समुद्रात – थांबवण्यावर एकमत केलं होतं.
हेही वाचा :
‘ऑपरेशन सिंदूर’ अजून संपलेले नाही!
‘भारताने ९० मिनिटांत ११ एअरबेस उद्ध्वस्त केले’
“भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून मशिदींचे नुकसान केल्याचा पाकचा दावा खोटा!”
मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची घेतली माहिती
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही या कराराची पुष्टी करत सांगितलं, “भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधीवर सहमती दर्शवली आहे. मात्र भारताचा दहशतवादाविरोधातील कठोर आणि ठाम भूमिका कायम राहणार आहे.”
मात्र संध्याकाळी श्रीनगरमध्ये झालेल्या स्फोटांमुळे संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आणि अनेक भागांत वीज पुरवठा खंडित करण्यात आला. याचवेळी भारतीय वायूदलाने राजस्थानच्या पोखरण आणि काश्मीरमधील बारामुला येथे घुसखोर पाकिस्तानी ड्रोन पाडले – ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे.







