30.9 C
Mumbai
Friday, November 27, 2026
घरस्पोर्ट्सफिलिप्स-ब्लंडेलची न्यूझीलंडला तारले; पहिल्या दिवसअखेर ५ बाद २४६

फिलिप्स-ब्लंडेलची न्यूझीलंडला तारले; पहिल्या दिवसअखेर ५ बाद २४६

Google News Follow

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात ५ बाद २४६ धावांची मजल मारली. टॉम ब्लंडेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद ६२ धावांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंडने दिवसअखेर डाव सावरला. हेगली ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात पहिल्या दोन सत्रांत भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले; मात्र अखेरच्या सत्रात ब्लंडेल आणि फिलिप्स यांनी संयमी फलंदाजी करत न्यूझीलंडला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. कॉनवे ३१ धावांवर बाद झाला. त्यानंतर लॅथमने अर्धशतक पूर्ण केले; मात्र आकाश दीपने त्याला ५९ धावांवर माघारी धाडले. अंशुल कंबोजने हेन्री निकोल्सला १६ धावांवर बाद केले, तर आकाश दीपने रचिन रवींद्रला खातेही उघडू दिले नाही.

यानंतर डॅरिल मिचेल आणि टॉम ब्लंडेल यांनी पाचव्या विकेटसाठी ७४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. वॉशिंग्टन सुंदरने मिचेलला ३१ धावांवर बाद करत भारताला पाचवे यश मिळवून दिले. त्यावेळी न्यूझीलंडची अवस्था ५ बाद १८४ अशी होती.

मात्र, त्यानंतर ब्लंडेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी भारतीय गोलंदाजांना आणखी यश मिळू दिले नाही. ब्लंडेलने नाबाद ५३ धावा केल्या असून फिलिप्स ३६ धावांवर खेळत आहे. दोघांनी मिळून ६२ धावांची नाबाद भागीदारी रचली आहे.

हेही वाचा :

२७ देशांमध्ये ‘रामायण’ सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट

भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात

जैशशी संबंधित संशयित दहशतवादी गुजरातमध्ये अटकेत

ममतांच्या भावाची पुतण्या अभिषेक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

भारताकडून आकाश दीपने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. अंशुल कंबोज, गुरनूर बरार आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल करण्यात आला असून प्रसिद्ध कृष्णाच्या जागी गुरनूर बरारला संधी देण्यात आली आहे. मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांना पुन्हा एकदा अंतिम अकरामध्ये स्थान मिळालेले नाही.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा