ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी विराट कोहली पुन्हा मैदानावर परतला आहे. त्याने गुजरात टायटन्सचे सहाय्यक प्रशिक्षक नईम अमीन यांच्या उपस्थितीत सराव केला. कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले, ‘फटकेबाजी करण्यात मदत केल्याबद्दल धन्यवाद. तुला पाहून नेहमीच आनंद होतो.’ त्याने सत्रादरम्यान अमीनसोबतचा स्वतःचा एक फोटो देखील शेअर केला.
अमीनने त्याच्या अकाउंटवर ही स्टोरी पुन्हा शेअर केली आणि म्हणाला, ‘ तुला पाहून आनंद झाला! लवकरच भेटू.’ अमीन बर्कशायर बकिंग हॅमशायर आणि लंडनमध्ये मायटी विलो अकादमी चालवतात. आणि यापूर्वी इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या कोचिंग स्टाफमध्ये होते.
यापूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू हार्दिक पंड्यानेही चांगल्या सराव सत्रांसाठी अमीन यांच्या अकादमीला भेट दिली होती. विराट कोहलीने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. कोहलीचे लक्ष आता पूर्णपणे भारतासाठीच्या एकदिवसीय सामन्यांवर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सोबतच्या इंडियन प्रीमियर लीगवर आहे.
कोहलीने ३०२ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४,१८१ धावा केल्या आहेत. त्याने शेवटचा आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात एक शानदार खेळी केली होती. विराट कोहलीने ४३ धावांची खेळी खेळली केली होती.
ज्यामुळे आरसीबीने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या विजेतेपदाच्या सामन्यात पंजाब किंग्जचा सहा धावांनी पराभव करून त्यांचा पहिला ट्रॉफी जिंकला. कोहलीला पुन्हा मैदानावर पाहण्यास क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. पण चाहत्यांना ऑक्टोबर महिन्यापर्यंत वाट पहावी लागणार आहे.







