24 C
Mumbai
Tuesday, January 27, 2026
घरस्पोर्ट्सअंडर-१९ विश्वचषक: विल मलाजुकचा विक्रमी झंझावात

अंडर-१९ विश्वचषक: विल मलाजुकचा विक्रमी झंझावात

Google News Follow

Related

नामिबिया क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या अंडर-१९ विश्वचषकातील गट ‘अ’ सामन्यात ऑस्ट्रेलियाने जपानवर ८ विकेट्सनी शानदार विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विल मलाजुकने अवघ्या ५१ चेंडूंमध्ये शतक झळकावत इतिहास रचला.

अंडर-१९ विश्वचषकाच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान शतक ठरलं आहे. याआधी हा विक्रम पाकिस्तानच्या कासिम अकरमच्या नावावर होता. कासिम अकरमने २०२२ च्या अंडर-१९ विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध ६३ चेंडूंमध्ये शतक झळकावलं होतं.

सामन्याचा आढावा घ्यायचा झाला तर जपानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हुगो तावी केली याने १३५ चेंडूंमध्ये नाबाद ७९ धावा केल्या. निहार परमानने ३३, मोंटोगोमेरी हारा-हिंजेने २९, चार्ली हारा-हिंजेने २४ धावा केल्या. अतिरिक्त ३० धावांच्या मदतीने जपानने ५० षटकांत ८ विकेट्स गमावत २०१ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून नादेन कोरेने १० षटकांत ३१ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. विल बायरोमने २, तर आर्यन शर्मा आणि कासे बार्टन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

२०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला विल मलाजुक आणि नितेश सॅम्युअल यांनी जोरदार सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी अवघ्या १५.३ षटकांत १३५ धावांची भागीदारी झाली आणि सामना एकतर्फी झाला.

विल मलाजुकने ५५ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १०२ धावांची तुफानी खेळी केली. स्टीवन होगान २० चेंडूंमध्ये १५ धावा करून बाद झाला. नितेश सॅम्युअल ७३ चेंडूंमध्ये ६० धावा करून नाबाद राहिला, तर टॉम होगानने २७ चेंडूंमध्ये १९ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाने अवघ्या २९.१ षटकांत २ विकेट्सच्या मोबदल्यात २०४ धावा करत सामना तब्बल १२५ चेंडू आधीच ८ विकेट्सनी जिंकला. या विक्रमी खेळीसाठी विल मलाजुकला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा