27.7 C
Mumbai
Thursday, July 23, 2026
घरस्पोर्ट्सभारतासाठी इशारा; झिम्बाब्वेने नवं अस्त्र बाहेर काढलं!

भारतासाठी इशारा; झिम्बाब्वेने नवं अस्त्र बाहेर काढलं!

त्सिगाची पहिलीच एन्ट्री, रझाची सेना सज्ज

Google News Follow

Related

भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेपूर्वी झिम्बाब्वेने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. अनुभवी सिकंदर रझाच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय संघात विकेटकीपर-फलंदाज तफादजवा त्सिगा याला प्रथमच टी-20 आंतरराष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःची छाप पाडल्यानंतर आता त्सिगाला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी मिळाली आहे.

संघात आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे अष्टपैलू वेस्ली मधेवेरे आणि वेगवान गोलंदाज न्यूमन न्यामहुरी यांचे पुनरागमन. दुखापतीतून सावरल्यानंतर न्यामहुरी पुन्हा संघात दाखल झाला असून, मधेवेरेलाही जवळपास वर्षभरानंतर टी-20 संघात संधी मिळाली आहे.

बांगलादेशविरुद्धची कसोटी आणि वनडे मालिका जिंकून आत्मविश्वास उंचावलेल्या झिम्बाब्वेचा टी-20 मालिकेत मात्र पराभव झाला होता. त्यामुळे भारताविरुद्धच्या मालिकेत दमदार पुनरागमन करण्याचा निर्धार यजमानांनी केला आहे.

दुसरीकडे, भारतालाही अलीकडे आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे हरारेत होणारी ही मालिका दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील अखेरच्या टी-20 विश्वचषक सुपर-८ सामन्यात भारताने ७२ धावांनी विजय मिळवला होता. त्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी आता झिम्बाब्वेसमोर असेल.

मालिकेचे वेळापत्रक :

  • २३ जुलै – पहिला टी-20
  • २५ जुलै – दुसरा टी-20
  • २६ जुलै – तिसरा टी-20
  • स्थळ: हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे

झिम्बाब्वेचा संघ : सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन करन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली मधेवेरे, तदीवानाशे मारुमानी (यष्टिरक्षक), वेलिंग्टन मसाकाद्झा, ब्लेसिंग मुजारबानी, डिऑन मायर्स, रिचर्ड नगरवा, न्यूमन न्यामहुरी, मिल्टन शुंबा आणि तफादजवा त्सिगा (यष्टिरक्षक).

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा