बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी पुन्हा एकदा ओटीटीवर धमाका करण्यास सज्ज आहे. तिच्या लोकप्रिय राजकीय ड्रामा मालिकेचा चौथा भाग ‘महारानी ४’ लवकरच प्रदर्शित होणार असून, याचा नवीन ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. या सिझनमध्ये आधीपेक्षा अधिक राजकीय कारस्थानं आणि सत्तासंघर्ष दिसून येत आहेत. मात्र, भारती देवी हार मानणाऱ्यांपैकी नाहीत — यावेळी त्या दिल्लीच्या राजगादीवर, म्हणजेच पंतप्रधानपदावर विराजमान होण्यासाठी झुंज देतील.
‘महारानी ४’च्या ताज्या ट्रेलरमध्ये भारती देवी यावेळी एकट्या नसून आपल्या कुटुंबासोबत दिसत आहेत. मालिकेत आता भारती सिंहची मुलगी आणि मुलगा या दोघांचीही एन्ट्री झाली आहे. भारती सिंहच्या मुलीची भूमिका अभिनेत्री श्वेता बसु प्रसाद हिने साकारली आहे, जी आपल्या आईची राजकीय परंपरा पुढे नेण्यासाठी संघर्ष करताना दिसेल. पण या वेळी कथानक दिल्लीच्या सत्तेभोवती फिरणार आहे. सीरिजमध्ये एक मोठा ट्विस्ट असाही आहे. दहा वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात भारती देवींना फसविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्या या परिस्थितीतून कशा प्रकारे बाहेर पडतात, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना मालिका पाहावी लागेल.
हेही वाचा..
पंतप्रधान मोदींनी जपानच्या पंतप्रधानांशी फोनवर साधला संवाद, कशावर झाली चर्चा?
पंतप्रधान मोदी ३०,३१ ऑक्टोबरला गुजरात, दिल्ली दौऱ्यावर
स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे ‘एकता परेड’ची रंगीत तालीम
गॅंगस्टर अबू सालेमच्या नावाचा वापर करून वृद्धाकडून ७१ लाख लुटले
‘महारानी ४’ ही मालिका ७ नोव्हेंबरपासून SonyLIV या प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. विशेष म्हणजे, मालिकेचे प्रदर्शन बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे. ६ नोव्हेंबरला बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान होणार असून, त्यानंतरच्या दिवशी म्हणजेच ७ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांना ही मालिका पाहायला मिळेल. ‘महारानी’चा प्रत्येक सिझन बिहारच्या राजकारणावर आधारित असल्याने निवडणुकीच्या काळात रिलीज होणे हे निर्मात्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
‘महारानी’चे पहिले तीन सिझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. पहिल्या भागात भारती देवी एकटीने सत्ते आणि स्वाभिमानासाठी संघर्ष करताना दिसल्या होत्या, पण आता त्यांच्या सोबत त्यांचे संपूर्ण कुटुंब आहे. ज्यामुळे बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा उथळ-पुथळ होणार आहे. मात्र, भारती सिंहचा मुलगाही मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहत असल्याने, यावेळी भारती देवींना कौटुंबिक संघर्षाचाही सामना करावा लागणार आहे. या सिझनमध्ये काही नवीन चेहरे देखील झळकणार आहेत. मालिकेत श्वेता बसु प्रसाद, प्रमोद पाठक, शार्दुल भारद्वाज, अमित सियाल, कनी कुसरुती आणि विनीत कुमार यांसारखे कलाकार सहभागी झाले आहेत.



