एतिहाद एरिनामध्ये मंगळवारी पार पडलेल्या आयपीएल २०२६ मिनी लिलावात सर्व १० संघांनी आपले ७७ रिक्त स्लॉट भरले. या लिलावात एकूण २१५.४५ कोटी रुपयांची उलाढाल झाली.
यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ने तब्बल ६३.८५ कोटी रुपये खर्च करून सर्वाधिक रक्कम उधळली, तर मुंबई इंडियन्सने अवघे २.२० कोटी रुपये खर्च करून सर्वात कमी खर्च करणारा संघ ठरला.
केकेआरचा मोठा डाव
कोलकाता नाईट रायडर्सने या लिलावात आक्रमक भूमिका घेत
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरन ग्रीनला २५.२० कोटी रुपयांना विकत घेतले.
यासह ग्रीन हा आयपीएल इतिहासातील तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला असून
तो सर्वात महाग विदेशी खेळाडू देखील बनला आहे.
याशिवाय मथीशा पथिराना (१८ कोटी), मुस्तफिझूर रहमान (९.२० कोटी) यांसारख्या खेळाडूंवरही मोठी बोली लावण्यात आली.
चेन्नईचा अनकॅप्डवर विश्वास
चेन्नई सुपर किंग्सने एकूण ४१ कोटी रुपये खर्च करत
भारतीय अनकॅप्ड खेळाडू प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांना प्रत्येकी १४.२० कोटी रुपयांना विकत घेतले.
हे दोघेही आयपीएल इतिहासातील सर्वात महाग अनकॅप्ड खेळाडू ठरले.
मुंबई इंडियन्सचा शांत लिलाव
मुंबई इंडियन्सने यंदाच्या लिलावात अत्यंत संयमी भूमिका घेत
फक्त २.२० कोटी रुपये खर्च केले.
क्विंटन डी कॉक (१ कोटी) हा त्यांचा सर्वात महाग खरेदीदार ठरला.
संघाच्या पर्समध्ये अद्याप ५५ लाख रुपये शिल्लक आहेत.
इतर संघांचा खर्च
-
दिल्ली कॅपिटल्स : २१.४५ कोटी
-
सनरायझर्स हैदराबाद : २०.०५ कोटी (लियाम लिव्हिंगस्टोन – १३ कोटी)
-
लखनऊ सुपर जायंट्स : १८.४० कोटी
-
आरसीबी : १६.१५ कोटी
-
राजस्थान रॉयल्स : १३.४० कोटी
-
गुजरात टायटन्स : १०.९० कोटी
-
पंजाब किंग्स : ८ कोटी
लिलावातील ठळक मुद्दे
-
कॅमरन ग्रीन – आयपीएलमधील तिसरा सर्वात महाग खेळाडू
-
प्रशांत वीर व कार्तिक शर्मा – महागडे अनकॅप्ड भारतीय खेळाडू
-
केकेआरचा सर्वाधिक, मुंबईचा सर्वात कमी खर्च
आयपीएल २०२६ साठी संघांची बांधणी पूर्ण झाली असून,
आता मैदानात कोणाचा डाव भारी पडतो याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.







