31.5 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरविशेषपुण्यातील पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात

पुण्यातील पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात

पाणी जपून वापरा

Google News Follow

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात घट झाल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाणीसाठा पुढील वर्षी ऑगस्टअखेरपर्यंत पुरवण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यात पाणीवापरात २० टक्के कपात करण्याचे नियोजन करण्यात येत असून, उन्हाळी हंगामातील सिंचन आवर्तन रद्द करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. पावसाचे अनिश्चित वेळापत्रक आणि संभाव्य एल निनोचा प्रभाव लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपलब्ध पाणीसाठा, शहराची पाण्याची गरज आणि आगामी काळातील संभाव्य परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत कमी असल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन जलसाठ्याचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. पुणे महापालिकेकडून दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले असून, पाणीवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्य सरकारनेही पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणीवापरात कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आगामी पावसाळा अपेक्षेपेक्षा उशिरा सुरू झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यासाठी शेती आणि अन्य वापरासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे फेरनियोजन करण्यावर भर दिला जात आहे. याचा परिणाम उन्हाळी हंगामातील सिंचनावर होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनाही पाण्याचे नियोजन अधिक काळजीपूर्वक करावे लागणार आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्र सायबरवर हॅकिंगचा प्रयत्न करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला नोटीस

गोल्ड ईटीएफमधील मोठ्या गुंतवणुकीला ब्रेक

१७ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांत एसएसआर

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
दरम्यान, पाण्याची चोरी, अनधिकृत उपसा आणि नासाडी रोखण्यासाठी महसूल, पोलीस, महावितरण आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त भरारी पथकांमार्फत कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमबाह्य पाणीउपसा करणाऱ्या पंपांवर कारवाई करण्यासह, आवश्यकतेनुसार वीजजोडणी खंडित करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. वाढती लोकसंख्या, शहराची पाण्याची गरज आणि पावसाबाबतची अनिश्चितता लक्षात घेता उपलब्ध जलसाठ्याचे योग्य व्यवस्थापन करणे प्रशासनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. पुणेकरांनीही पाण्याचा अपव्यय टाळून आवश्यक तेवढेच पाणी वापरावे, असे आवाहन करण्यात येत आहे. आगामी उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आणि प्रशासनाचे काटेकोर नियोजन निर्णायक ठरणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा