29.9 C
Mumbai
Tuesday, October 20, 2026
घरक्राईमनामामहाराष्ट्र सायबरवर हॅकिंगचा प्रयत्न करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला नोटीस

महाराष्ट्र सायबरवर हॅकिंगचा प्रयत्न करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला नोटीस

अतिप्रगत सुरक्षा यंत्रणेमुळे सायबर हल्ला वेळीच उधळला

Google News Follow

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्याची नोडल यंत्रणा म्हणून काम करणाऱ्या ‘महाराष्ट्र सायबर’च्या स्वतःच्याच डिजिटल पायाभूत सुविधांवर हॅकिंगचा आणि घातपाताचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, विभागाच्या अतिप्रगत सुरक्षा प्रणाली आणि ‘सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर’च्या (SOC) सतर्कतेमुळे हा हल्ला सुरुवातीलाच उधळवून लावण्यात आला. या प्रकरणी तांत्रिक तपासाअंती एका २२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा सहभाग उघडकीस आला असून, त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याला नोटीस बजावण्यात आली आहे.

१५ ऑगस्ट २०२६ रोजी विभागाच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरवर सायबर हल्ला करण्याचा आणि सिस्टीममध्ये बेकायदेशीरपणे शिरकाव (intrusion) करण्याचा प्रयत्न झाला. विभागाच्या ‘सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर’च्या (SOC) अत्याधुनिक मॉनिटरिंग सिस्टीमने ही संशयास्पद हालचाल तात्काळ हेरली. टेक्निकल टीमने तात्काळ पावले उचलत हा सायबर हल्ला जागीच रोखला, ज्यामुळे पुढील संभाव्य धोका टळला.

हल्ला निष्प्रभ केल्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक माग काढण्यास सुरुवात केली. या सायबर हल्ल्याचे डिजिटल फूटप्रिंट्स आणि संबंधित ‘आयपी ॲड्रेस’चे (IP Address) सखोल विश्लेषण (बॅकवर्ड ट्रेसिंग) करण्यात आले. या तपासाअंती एका २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा या सायबर हल्ल्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. महाराष्ट्र सायबरने या तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली व चौकशीअंती त्याला कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून नोटीस बजावली आहे.

हे ही वाचा:

तिरंगा यात्रेपूर्वी अभिजित दिपकेला नोटीस

“निवडणूक सुधारणांचा नव्हे, सत्ता बळकावण्याचा कट”

डोंगराळे चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणी नराधम विजय खैरनारला फाशी!

“दहा वेळा सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो”

विद्यार्थी आणि तरुणांना सायबर विभागाचा इशारा

कोणत्याही शासकीय वेबसाईट, सर्व्हर किंवा डिजिटल सिस्टीममध्ये अनधिकृतरीत्या शिरकाव करणे, चाचणी घेणे (probing/testing) किंवा हॅक करण्याचा प्रयत्न करणे हा कायद्यानुसार गंभीर व दखलपात्र गुन्हा आहे. विशेषतः तंत्रज्ञानाची आवड असणारे तरुण व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर कारवायांमध्ये अडकू नये; अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र सायबर विभागाने दिला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा