गेल्या आठवड्यात बांगलादेशात दीपू दास या हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आली याशिवाय त्याचा मृतदेह जाळण्यात आला. हिंदू व्यक्तीच्या हत्येवरून भारतासह जगभरात संताप व्यक्त होत असताना, मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश सरकारमधील एका वरिष्ठ सल्लागाराने म्हटले आहे की, सरकार दीपू चंद्र दासच्या कुटुंबाची जबाबदारी घेत आहे. वृत्तसंस्था पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे. बांगलादेशातील शिक्षण सल्लागार सीआर अबरार यांनी मयमनसिंगमध्ये मारल्या गेलेल्या हिंदू व्यक्तीच्या वडिलांचीही भेट घेतली.
बांगलादेशमध्ये हिंदुंवरील अत्याचार सुरूच असून जगभरात याबद्दल संताप व्यक्त होत आहे. भारतातील अनेक हिंदू संघटना बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल न्याय मागत आहेत. यासाठी नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. अशाच गटांनी कोलकाता येथील बांगलादेश उपउच्चायुक्तालयाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. व्यापक निदर्शनांमुळे भारत- बांगलादेश राजनैतिक संबंधांमध्ये नवीन ताण निर्माण झाला आहे, त्यामुळे दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजदूतांना बोलावले आहे.
हे ही वाचा..
“युनूस सरकारमधील एका गटाने शरीफ उस्मान हादीची हत्या केली”
“… नाहीतर कार्यालय पेटवून देऊ” ग्लोबल टीव्ही बांगलादेशला धमकी
भारताची अंतराळात मोठी झेप! इस्रोकडून सर्वात वजनदार उपग्रह प्रक्षेपित
मदरसा विधेयकाची माघार घेण्यास योगी मंत्रिमंडळाची मंजुरी
बांगलादेशातील दीपू चंद्र दास नावाच्या हिंदू व्यक्तीच्या हत्येविरोधात मंगळवारी भारतातील लोक मोठ्या संख्येने शहरांमध्ये बाहेर पडले. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा आरोप करत न्याय मागण्यासाठी नवी दिल्ली, कोलकाता, भोपाळ, जम्मू, अगरतळा, मुंबई आणि हैदराबाद येथे निदर्शने झाली. बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार केल्याच्या भारतीयांच्या आरोपांदरम्यान, बांगलादेशचे शिक्षण सल्लागार सीआर अबरार यांनी मयमनसिंगमध्ये मारहाणीत मारले गेलेले वस्त्र कामगार दिपू चंद्र दास यांच्या कुटुंबाची भेट घेतली. शिक्षण सल्लागारांनी पुनरुच्चार केला की, “ही हत्या एक घृणास्पद गुन्हेगारी कृत्य आहे ज्याचे कोणतेही समर्थन नाही आणि बांगलादेशी समाजात त्याचे कोणतेही स्थान नाही.”.







