27 C
Mumbai
Monday, February 9, 2026
घरविशेषमोदी सरकारकडून राज्यात रेल्वेची १ लाख ६४ हजार कोटींची गुंतवणूक

मोदी सरकारकडून राज्यात रेल्वेची १ लाख ६४ हजार कोटींची गुंतवणूक

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे प्रतिपादन

Google News Follow

Related

मोदी सरकार आणि महायुती सरकारच्या विकासकार्याच्या गतीमुळे रेल्वे,विकासाच्या फास्ट ट्रॅकवर चालत आहे. मोदी सरकारने महाराष्ट्रात तब्बल १ लाख ६४ हजार ६०५ कोटींची गुंतवणूक रेल्वे विकासासाठी केली आहे. राज्यात नवीन रेल्वे मार्ग, कॉरिडॉर निर्मिती, रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, फ्लायओव्हर, पूल बांधणीमुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान, सुखकर होण्याबरोबरच राज्याच्या विकासाला गती मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी केले. भाजपा मीडिया सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अश्विनी वैष्णव यांनी राज्यात रेल्वेकडून पायाभूत सुविधा बळकटीकरणासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचे संकल्पचित्र व्हिडिओ सादरीकरणाद्वारे पत्रकार परिषदेत मांडले. देशाच्या विकासात आर्थिक राजधानी मुंबईसह राज्याचा महत्वाचा वाटा असल्याने मोदी सरकारने तब्बल १ लाख ६४ हजार ६०५ कोटींची गुंतवणूक रेल्वे विकासासाठी केली आहे. याअंतर्गत सहा हजार किमीचे नवीन ट्रॅक, १३२ स्थानकांचा ‘अमृत भारत स्थानक’ कार्यक्रमाअंतर्गत कायापालट, नवीन मेट्रो मार्ग, बुलेट ट्रेन्स, फ्रेट कॉरिडॉर्स (मालवाहतुकीचे विशेष मार्ग) अशी विविध विकासकामे प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील कनेक्टिवीटी वाढवण्याची कामेही सुरू असून जालना- जळगाव नवीन मार्गाद्वारे मराठवाडा तसेच मनमाड इंदोर नवीन मार्गाद्वारे खानदेश ‘जेएनपीटी’शी जोडला जाईल.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गांवरही अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. एकूण १,३०० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहे. राज्यात १६ हजार २४० कोटी खर्च करून ३०१ किमीचे नवे रेल्वे मार्ग बांधणी सुरू आहे. प. रेल्वेवर मुंबई सेंट्रल, बांद्रा, वसई, जोगेश्वरी तसेच मध्य रेल्वेवर सीएसएमटी, एलटीटी, कल्याण, पनवेल, परेल यासह अन्य स्थानके देखील टर्मिनस होणार आहेत. छोट्या रेल्वे स्थानकांचाही पुनर्विकास व्हावा ही नरेंद्र मोदी यांची विकासदृष्टी आहे म्हणूनच लासलगाव, बडनेरा, पंढरपूर, नांदगाव यासारख्या छोट्या स्थानकांचा ही पुनर्विकास होत आहे.

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदी नायजेरिया, ब्राझील, गयानाच्या पाच दिवसीय दौऱ्यावर रवाना

नक्षलप्रभावित भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट; जीवितहानी नाही

वाशी चेकनाका परिसरातून ८० कोटींची चांदी जप्त

अभिनेत्री दिशा पाटनी हिच्या वडिलांना २५ लाखांचा गंडा; पाच जणांविरोधात तक्रार दाखल

मुंबईकरांचा उपनगरीय रेल्वेप्रवास होणार सुखकर

लोकल ट्रेनची प्रवासी क्षमता वाढ आणि सुरक्षितता याला प्रधान्य दिले जात असून त्यासाठी १६ हजार २४० कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत. ८९१ कोटी रुपये खर्चून सीएसएमटी ते कुर्ला पाचवी आणि सहावी लाईन, मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावी लाईन यांचे काम सुरू आहे. उपनगरीय लोकल रेल्वे मार्गावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे नवीन मार्ग बांधणी वेगाने होत असल्याने येत्या पाच ते सहा वर्षांत दररोज ६०० ट्रेन्स ट्रॅकवर धावतील त्यामुळे लोकल प्रवाशांना दिलासा मिळेल. गोरेगाव पर्यंत पोहोचलेला हार्बर मार्ग बोरीवली पर्यंत वाढवण्यात येत असून त्यासाठी तब्बल ८२६ कोटींची जागा घेण्यात आली आहे. जानेवारी २०२५ पर्यंत हा मार्ग कार्यान्वित होईल असेही वैष्णव म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी फायद्याची शेतकरी समृद्धी ट्रेन

शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत वेळेत पोहोचवण्यासाठी नाशिकपासून शेतकरी समृद्धी ट्रेन सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेसाठी पूर्वीच्या अनुभवांचा वापर करून दलालांना दूर ठेवत छोटे शेतकरी त्यांचा शेतमाल या ट्रेनद्वारे बाजारपेठेत पोहोचवू शकतात, असे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा