30.6 C
Mumbai
Sunday, April 19, 2026
घरविशेषपॅरालिम्पिक सुवर्ण विजेत्या सुमित अंतिलचा प्रशिक्षकावर आरोप, नीरज चोप्राचा पाठिंबा

पॅरालिम्पिक सुवर्ण विजेत्या सुमित अंतिलचा प्रशिक्षकावर आरोप, नीरज चोप्राचा पाठिंबा

मानसिक छळ केल्याचा आरोप

Google News Follow

Related

पॅरालिंपिक सुवर्णपदक विजेता सुमित अंतीलने द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक नवल सिंग यांच्यावर मानसिक छळ आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करत भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) कडे तक्रार दाखल केली आहे. अंतील याच्या या आरोपांना ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याने पाठिंबा दिला आहे. अंतीलच्या मते, सिंग यांचे वर्तन खेळाडूंसाठी हानिकारक ठरले आहे.

टोकियो २०२० आणि पॅरिस २०२४ पॅरालिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अंतील याने आरोप केला की, नवल सिंग यांनी त्याला आणि नीरज चोप्रा यांना वारंवार लक्ष्य केले. तसेच, त्यांनी व्यावसायिक मर्यादा ओलांडत त्यांच्या कुटुंबीयांबद्दलही अपमानास्पद वक्तव्ये केली. “त्यांनी आम्हाला मानसिक त्रास दिला आणि माझ्या तसेच नीरजच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली. ते मानसिकदृष्ट्या अस्थिर वाटतात,” असे अंतीलने पीटीआयला सांगितले.

२०२८ लॉस एंजेलिस पॅरालिंपिकमध्ये F६४ गटात भारतासाठी पदकाची प्रमुख आशा मानले जाणारे अंतील म्हणाला की, परिस्थिती कालांतराने अधिकच बिघडत गेली आणि अखेरीस त्यांना अधिकृत तक्रार दाखल करावी लागली. “ते जाणूनबुजून त्यांच्या शिवीगाळीचे रेकॉर्डिंग आमच्या मॅनेजर्सना पाठवत असत, जेणेकरून ते आमच्यापर्यंत पोहोचेल,” असे त्याने सांगितले.

‘साई’ने ही तक्रार मिळाल्याची पुष्टी केली असून संबंधित फेडरेशनकडे हा विषय पाठवण्यात आला आहे. मात्र, ‘साई’ने स्पष्ट केले की नवल सिंह हे त्यांच्या संस्थेचे कर्मचारी नाहीत आणि सध्या ते ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराचा भाग म्हणून कार्यरत आहेत.

‘साई’च्या एका सूत्राने सांगितले, “पॅरालिंपिक सुवर्णपदक विजेता सुमित अंतिलने प्रशिक्षक नवल सिंग यांच्याविरोधात शिवीगाळीची तक्रार केली आहे. या तक्रारीला नीरज चोप्रा यांच्यासह इतर खेळाडूंनीही पाठिंबा दिला आहे.” २०१५ मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित झालेले नवल सिंह सध्या सचिन यादव याला प्रशिक्षण देत आहेत. सचिन यादव यांनी गेल्या वर्षीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चौथे स्थान मिळवले होते, ज्यात दुखापतीमुळे खेळणाऱ्या नीरज चोप्रा यांनी आठवे स्थान मिळवले होते. या आरोपांवर नव्हाल सिंह यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हे ही वाचा:

तिसऱ्या मुंबईला गती! २७ एप्रिलपासून जमीन अधिग्रहणासाठी संमती प्रक्रिया सुरू

कॉर्पोरेट जिहादप्रकरणी मानवाधिकार आयोगाच्या नोटिसा

बुधवारपर्यंत इराणसोबत करार न झाल्यास पुन्हा हल्ले!

होर्मुझ सामुद्रधुनी बंदच; डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांना इराणने फेटाळले

अंतिलने सांगितले की त्यांच्या तक्रारीला नीरज चोप्रा यांच्यासोबतच पॅरा भालाफेकपटू नवदीप सिंग आणि संदीप चौधरी  यांचाही पाठिंबा आहे. “आम्ही एक आठवड्यापूर्वी ‘साई’चे महासंचालक हरी रंजन राव आणि टॉप्स (टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम) चे सीईओ यांच्याकडे तक्रार केली. पहिल्याच सुनावणीत आम्हाला तडजोड करण्यास सांगितले गेले,” असे अंतिल म्हणाला.

“आम्ही हा मुद्दा बराच काळ दुर्लक्षित केला, पण परिस्थिती असह्य झाल्यावर तक्रार करण्याचा निर्णय घेतला. मी तक्रार दाखल केली आणि नीरज भाऊ, नवदीप सिंह आणि संदीप चौधरी यांनी त्याला पाठिंबा दिला,” असे त्यांनी सांगितले. तक्रार दाखल केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या प्रतिसादावरही अँटिल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“आमच्यासारख्या खेळाडूंची दखल घेतली जात नसेल, तर इतरांनी काय अपेक्षा ठेवावी? अजूनपर्यंत तक्रारीची अधिकृत नोंदही मिळालेली नाही,” असे त्यांनी नमूद केले. तसेच, प्रशिक्षकांच्या हेतूंवरही त्यांनी शंका व्यक्त केली आणि त्यांच्या वर्तनामागे स्पर्धात्मक स्वार्थ असू शकतो, असे सूचित केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा