29.6 C
Mumbai
Wednesday, November 4, 2026
घरविशेषभूतानमध्ये १०८ बौद्ध स्तूपांची उभारणी; ७६वा स्तूप मोदींच्या नावे समर्पित

भूतानमध्ये १०८ बौद्ध स्तूपांची उभारणी; ७६वा स्तूप मोदींच्या नावे समर्पित

पंतप्रधान मोदींना विशेष सन्मान

Google News Follow

भारत आणि भूतान यांच्यातील दृढ आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संबंधांची विशेष झलक अलीकडेच पाहायला मिळाली. भूतानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनोख्या सन्मानाने गौरवले आहे. भूतानमध्ये अवघ्या नऊ तासांत १०८ बौद्ध स्तूपांची (जांगचुब चोर्टेन) उभारणी करण्यात आली. या वेळी ७६वा स्तूप पंतप्रधान मोदी यांच्या नावाने समर्पित करण्यात आला.

भारत-भूतान मैत्रीचे प्रतीक असलेला हा स्तूप गेलेफू माइंडफुलनेस सिटी येथे उभारण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सांगितले की, १ नोव्हेंबर २०२६ रोजी भूतानमध्ये अवघ्या नऊ तासांत १०८ बौद्ध स्तूपांची उभारणी करण्यात आली. या वेळी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना समर्पित करण्यात आलेल्या ७६व्या स्तूपाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्याप्रती हा विशेष सन्मान असल्याचे सांगत रणधीर जयस्वाल म्हणाले की, ही कामगिरी भारत आणि भूतान यांच्यातील दृढ आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संबंधांचे कायमस्वरूपी प्रतीक ठरेल.

हे ही वाचा:

अग्निवीरांचा सेवाकाळ चार वरून सहा वर्षे!

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील ‘एम’ फॅक्टर

ज्येष्ठ पत्रकार शेखर जोशी यांचे निधन

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत भारतीय वंशाच्या नेत्यांची विजयी हॅट्ट्रिक

भूतानमध्ये बौद्ध स्तूपांना धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. बौद्ध परंपरेनुसार, जांगचुब चोर्टेन हे ज्ञानप्राप्ती आणि आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे १०८ स्तूपांची उभारणी ही धार्मिक परंपरेशी संबंधित महत्त्वाची कामगिरी मानली जात आहे. गेलेफू माइंडफुलनेस सिटी भूतानच्या दक्षिण भागात भारताच्या सीमेजवळ स्थित आहे. हा विशेष प्रशासकीय क्षेत्र म्हणून विकसित केला जात असून, भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक यांच्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पाचा तो भाग आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा