28 C
Mumbai
Monday, September 7, 2026
घरविशेषरेल्वेच्या १२ स्पेशल गाड्या नोव्हेंबरपर्यंत धावणार

रेल्वेच्या १२ स्पेशल गाड्या नोव्हेंबरपर्यंत धावणार

Google News Follow

Related

पश्चिम रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन विविध मार्गांवरील स्पेशल ट्रेनच्या फेऱ्यांना मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे मुंबईसह गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या स्पेशल ट्रेन्सच्या विस्तारित फेऱ्यांची बुकिंग १ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, खालील स्पेशल ट्रेनच्या फेऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

कोणत्या ट्रेनच्या फेऱ्यांना मुदतवाढ?

१. ०९२०७ बांद्रा टर्मिनस–भावनगर टर्मिनस साप्ताहिक स्पेशल २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत, तर ०९२०८ भावनगर टर्मिनस–बांद्रा टर्मिनस साप्ताहिक स्पेशल २६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत धावणार आहे.

२. ०९०३३ उधना–मालदा टाउन साप्ताहिक स्पेशल २६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत, तर ०९०३४ मालदा टाउन–उधना साप्ताहिक स्पेशल २९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, ०९०३३ ही ट्रेन २४ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी धावणार नाही. ०९०३४ ही ट्रेन २७ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर रोजी धावणार नाही.

३. ०९०६५ सूरत–छपरा साप्ताहिक स्पेशलच्या फेऱ्या २० ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत, तर ०९०६६ छपरा–सूरतच्या फेऱ्या २१ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.

४. ०९११९ प्रतापनगर–लालकुआं साप्ताहिक स्पेशल २९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत आणि ०९१२० लालकुआं–प्रतापनगर साप्ताहिक स्पेशल ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत धावणार आहे.

५. ०९१९५ प्रतापनगर–मऊ साप्ताहिक स्पेशल २८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत आणि ०९१९६ मऊ–प्रतापनगर साप्ताहिक स्पेशल २९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.

६. ०९४२४ अहमदाबाद–मंगळुरू साप्ताहिक स्पेशल २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत, तर ०९४२३ मंगळुरू–अहमदाबाद साप्ताहिक स्पेशल २८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत धावणार आहे.

७. ०९४५१ गांधीधाम–भागलपूर साप्ताहिक स्पेशल २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत आणि ०९४५२ भागलपूर–गांधीधाम साप्ताहिक स्पेशल ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत धावणार आहे.

८. ०९४२५ साबरमती–हरिद्वार साप्ताहिक स्पेशल १९ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर २०२६ आणि ०९४२६ हरिद्वार–साबरमती साप्ताहिक स्पेशल २० ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

९. ०९५२३ ओखा–शकूर बस्ती साप्ताहिक स्पेशल २० ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर २०२६, तर ०९५२४ शकूर बस्ती–ओखा साप्ताहिक स्पेशल २१ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत धावणार आहे.

१०. ०९२०३ वेरावल–हरिद्वार साप्ताहिक स्पेशल २० ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर २०२६, तर ०९२०४ हरिद्वार–वेरावल साप्ताहिक स्पेशल २१ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.

११. ०९२५७ भावनगर टर्मिनस–शकूर बस्ती साप्ताहिक स्पेशल १६ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर २०२६, तर ०९२५८ शकूर बस्ती–भावनगर टर्मिनस साप्ताहिक स्पेशल १७ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत धावणार आहे.

१२. ०९३०९ इंदूर–हजरत निजामुद्दीन द्विसाप्ताहिक स्पेशल २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत, तर ०९३१० हजरत निजामुद्दीन–इंदूर द्विसाप्ताहिक स्पेशल २८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.

बुकिंग कधी सुरू?

या विस्तारित फेऱ्यांची बुकिंग १ सप्टेंबर २०२६ पासून सर्व पीआरएस काऊंटर तसेच आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर सुरू होणार आहे.

ट्रेनची वेळ, थांबे आणि रेक संरचनेची सविस्तर माहिती प्रवाशांना www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर मिळणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा