30 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
घरविशेषआसाममधल्या एकमेव रामसार क्षेत्राला नवसंजीवनी

आसाममधल्या एकमेव रामसार क्षेत्राला नवसंजीवनी

Google News Follow

Related

कामरूप (मेट्रोपोलिटन) जिल्हा प्रशासनाने दीपर बील या तलावातील मासेमारीवर संवर्धनाच्या दृष्टीने बंदी घातली आहे. गुवाहाटीच्या दक्षिणेला असलेला हा तलाव आसाम मधील एकमेव रामसार क्षेत्र आहे.

या क्षेत्राच्या संरक्षणासाठी जिल्हा प्रशासनाने क्रिमीनल प्रोसिजर कोड(सी.आर.पी.सी)च्या १४४ कलमानुसार ३ जानेवारीपासून बंदी घातली आहे. ही बंदी मध्य जानेवारीमधील भोगली बिहूच्या पुढे लागू राहिल.

या तलावाच्या क्षेत्रातील काही लोक या तलावात मासेमारीचे सामुहिक कार्यक्रम करू इच्छितात. या तलावाच्या प्रदेशातील गावे जसे की केओतपारा, मिकीरपारा, पासपारा, आझरा, तेतेलिया या गावांतील लोक सामुहिक मासेमारीचा उपक्रम राबवू इच्छितात असे पश्चिम गुवाहाटीच्या पोलिस कमिशनरांकडून कळले आहे.

वन्य जीव संरक्षण कायदा १९७२ नुसार अशाप्रकारे संरक्षित क्षेत्रात वन्यजीव हत्या प्रतिबंधीत आहे. यामुळे वन्यजीवांचे अपरिवर्तनीय नुकसान होऊ शकते. त्यामुळे वन्यजीव संरक्षण विभाग, गुवाहाटी यांनी मासेमारी १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीसाठी प्रतिबंधीत असल्याची अधिसूचना जारी केली आहे.

तलावाच्या आकारमानात घट

दीपोर बील तलाव २००२ पासून रामसार क्षेत्र आहे. हा तलाव त्यावर अवलंबून असणाऱ्या पक्ष्यांच्या २१९ विविध प्रजाती आणि वैशिष्ट्यपूर्ण जल-परिसंस्थेसाठी आवश्यक आहे. त्यामुळेच हा तलाव रामसार क्षेत्र म्हणून मान्यता पावला आहे.

रामसार क्षेत्र हे पर्यावरणीयदृष्ट्या आवश्यक अशा स्थानांना प्राप्त होणारे आंतरराष्ट्रीय मानांकन आहे. हे मानांकन २ फेब्रुवारी १९७१ रोजी इराणी शहर रामसार येथे मंजूर करण्यात आलेल्या करारानुसार दिले जाते, आणि ते त्याच नावाने ओळखले जाते.

जलतज्ञांच्या मते १९८० मध्ये या तलावाचे क्षेत्रफळ ६००० हेक्टर होते. उपग्रहांद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रांचा अभ्यास केल्यानंतर या तलावाच्या क्षेत्रात सातत्याने घट होत असल्याचे समोर येत आहे. या अभ्यासानुसार १९९१ पासून या तलावाचे क्षेत्र ३१ टक्क्यांनी घटले आहे. गुवाहाटीताल वाढत्या शहरीकरणामुळे या तलावाचा कालमोनी, खोनाजा आणि बसिस्था यांसारख्या छोट्या नद्यांशी असलेला संबंध घटन गेल्याने तलावावर विपरित परिणाम झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा