33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
घरविशेषअंबानी जामनगरमध्ये साकारणार जगातील सर्वात मोठे प्राणिसंग्रहालय!!

अंबानी जामनगरमध्ये साकारणार जगातील सर्वात मोठे प्राणिसंग्रहालय!!

Google News Follow

Related

जामनगर (गुजरात) येथे रिलायन्स इंडस्ट्रीज जागतिक दर्जाचे प्राणी संग्रहालय उभारत आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने या प्राणिसंग्रहालयाच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. हा अनंत अंबानी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. २८० एकरच्या विशाल भूखंडावर हे भव्य संग्रहालय उभे ठाकणार आहे. जिथे १०० पेक्षा अधिक प्रजातींचे प्राणी, पक्षी असणार आहेत.

“आम्ही या प्रकल्पावर काम करायला सुरुवात केली आहे. हे प्राणी संग्रहालय सिंगापुर येथील प्राणी संग्रहालयपेक्षाही मोठे असेल. या प्रकल्पाचा डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) आणि मास्टर प्लॅन हा संबंधित सरकारी कार्यालयांना पाठवलेला आहे. १२ फेब्रुवारी २०१९ रोजी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणासोबत झालेल्या ३३ व्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे.” अशी माहिती रिलायन्स चे संचालक परिमल नथवानी यांनी दिली आहे.

‘ग्रीन्स झूलॉजिकल, रेस्क्यु अँड रिहॅबिलिटेशन किंग्डम’ असे संग्रहालयाचे नाव असणार आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व सरकारी परवानग्या रिलायन्सला मिळाल्या होत्या, पण कोविड मुले हा प्रकल्प लांबणीवर पडला. आता या प्रकल्पाचे काम सुरु होणार असून, पुढच्या दोन वर्षात संग्रहालय नागरिकांसाठी खुले होणार आहे. या प्राणिसंग्रहालयात बंगाल टायगर, ओरँगुटन प्रजातीची माकडे, अफ्रिकन सिंह, चित्ता, भारतीय लांडगा, आशियाई सिंह, अफ्रिकन हत्ती, झेब्रा,जिराफ गोरिल्ला, पाणघोडा, स्लॉथ बेअर, कोमोडो ड्रॅगन अशा विविध प्रजातींचे प्राणी-पक्षी पाहायला मिळणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा