33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरविशेष२६/११ दहशदवादी हल्ल्याला १५ वर्ष पूर्ण

२६/११ दहशदवादी हल्ल्याला १५ वर्ष पूर्ण

आजही मुंबईकरांच्या काळजाचा चुकतोय ठोका

Google News Follow

Related

संपूर्ण देशालाच नाही तर जगाला हादरवून सोडणाऱ्या मुंबईवरील २६/११ या दहशदवादी हल्याला आज १५ वर्ष पूर्ण होत आहेत. २००८ मध्ये लष्कर ए तोयबाच्या या दहशतवादी हल्यात तब्बल १६० पेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला होता तर ३०० नागरिक जखमी झाले होते. या घटनेच्या १५ वर्षानंतरही समुद्र सुरक्षेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुंबईतील महत्वाची ठिकाणे यातील दहशदवाद्यांनी लक्ष्य केली होती. यातील जिवंत सापडलेल्या अजमल कसब या दहशदवाद्याला अटक करून त्याला फासावर चढवण्यात आले. या हल्ल्यात महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तबगार अधिकारी आणि कर्मचाऱ्यानी आपल्या प्राणाची आहुती दिली. आजही हि आठवण मुंबईकरांच्या अंगावर काटा उभी करते.

हेही वाचा..

पंतप्रधानांनी ड्रेसिंग रूममध्ये येणे ही खूप मोठी गोष्ट!

आता संजय राऊत म्हणतात, इस्रायलला दुखावण्याचा हेतू नव्हता!

अंतरावालीत पिस्तुलासह अटक झालेला ऋषीकेश बेदरे कोण?

‘दुष्ट आत्म्यापासून मुक्ती मिळेल’ परंतु त्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल!

 

२६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री सुरू झालेल्या गोळीबाराने मुंबई हादरली होती. हल्लेखोरांनी मुंबईतील दोन फाईव्ह स्टार हॉटेल्स, एक हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन आणि ज्यू सेंटरला टार्गेट केले होते. या हल्ल्याबाबत तसा कोणालाच पहिल्यांदा अंदाज आलं नव्हता. यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, आयपीएस अधिकारी असलेले अशोक कामटे, निरीक्षक विजय साळस्कर, सैन्यदलाचे संदीप उन्नीकृष्णन, पोलीस तुकाराम ओमबाळे यांना वीरगती प्राप्त झाली. लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून सुरू झालेले हे मृत्यूचे तांडव ताजमहाल हॉटेलजवळ जाऊन थांबले. सुरक्षा दलाच्या जवानांना या ऑपरेशनसाठी ६० तासांहून अधिक वेळ लागला होता.  अधिकृत आकडेवारीनुसार, लिओपोल्ड कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारात १० जण मृत्युमुखी पडले. छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात ५८ लोक मृत्युमुखी पडले. ओबेरॉय हॉटेल बिझनेस क्लासमध्ये खूप फेमस आहे. दहशवादी या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर दारूगोळा घेऊन घुसले.

असं म्हटलं जातं की, त्यावेळी हॉटेलमध्ये जवळपास ३५० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. आत घुसल्यानंतर दहशतवाद्यांनी अनेकांना ओलीस ठेवलं होतं. गेटवे ऑफ इंडियाजवळ असलेलं हे ताजमहाल हॉटेलमध्ये झालेल्या हल्ल्यात ३१ लोक मृत्यमुखी पडले. त्यानंतर कामा रुग्णालय टार्गेट करण्यात आले. या हल्ल्याची आठवण आजही अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ठरत आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा