27 C
Mumbai
Wednesday, August 17, 2022
घरविशेषकुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली; १९ मृत्यू

कुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली; १९ मृत्यू

Related

कुर्ल्यातील नाईक नगर परिसरात चार मजली इमारत काल, २७ जून रोजी रात्री ११.३० च्या सुमारास कोसळली होती. या दुर्घटनेत अगोदर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता या दुर्घटनेत मृतांचा आकडा हा तब्बल १९ वर गेला आहे.

अजय भोले पासपोर (२८), अजिंक्य गायकवाड(३४), कुशर प्रजापती(२०), सिकंदर राजभर(२१), अरविंद भारती(१९), अनुप राजभर(१८), अनिल यादव(२१), शाम प्रजापती(१८) यासह अजून अकरा जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर चार जणांची प्रकृती स्थिर आहे. नऊ जणांचा उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

घटना घडली त्या मतदार संघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर हे सध्या इतर बंडखोर आमदारांसह गुवाहाटीला आहेत. ही घटना कळताच त्यांनी आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी मृत आणि जखमींसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. २७ जूनला रात्री ही इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुरुवातीला २० ते २५ लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने बचावकार्य सुरु केले होते.

हे ही वाचा:

माकडाला चिप्स देताना तो पडला दरीत!

माझ्यासमोर बसा, संभ्रम दूर करा…उद्धव ठाकरे यांचे आमदारांना आवाहन

‘त्या’ कुटुंबाची आत्महत्या नसून हत्या

शापूरजी पालनजी उद्योगसमुहाचे प्रमुख पद्मभूषण पालनजी मिस्त्री यांचे निधन

दरम्यान, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतींना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस देण्यात आली होती. तरीही या इमारतींमध्ये ८ ते १० कुटुंबे राहत होती. हे सर्व भाडेकरू असल्याची माहिती समोर आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,914चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा