26 C
Mumbai
Tuesday, August 16, 2022
घरक्राईमनामानुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या युवकाचा मुस्लिम तरुणांनी केला शिरच्छेद; पंतप्रधान मोदींनाही मारण्याची...

नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या युवकाचा मुस्लिम तरुणांनी केला शिरच्छेद; पंतप्रधान मोदींनाही मारण्याची दिली धमकी

Related

नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद देशभरच नव्हे तर परदेशातही उमटले होते. त्यानंतर नुपूर शर्मा यांना ठार मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. याच नुपूर शर्मा यांना समर्थन देणाऱ्या एका युवकाची राजस्थानात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. राजस्थानातील उदयपूर येथे कन्हैय्यालाल याची शीर धडावेगळे करून हत्या करण्यात आली. एवढेच नव्हे तर या दोघांनी व्हीडिओ करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचीही धमकी दिली आहे. राजस्थानात सध्या काँग्रेसचे सरकार आहे. भाजपेतर राज्यात अशा घटनांची संख्या वाढती आहे, हे या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

कन्हैय्यालाल आपल्या कपड्याच्या दुकानात काम करत असताना दोन मुस्लिम युवक दुकानात कपडे शिवण्याच्या बहाण्याने शिरले. तो मोजमाप घेत असताना त्यांनी कन्हैय्यालालची हत्या केली. या भयंकर कृत्यामुळे राजस्थानमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले आहे. त्यावर कडी म्हणजे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेचा निषेध केला पण देशात सौहार्दाचे वातावरण राहावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देशाला आवाहन करावे.

मोहम्मद रियाझ आणि मोहम्मद यांनी हसत हसत हा व्हीडिओ केला आहे. हातात अत्यंत धारदार असे चॉपर घेऊन त्यांनी हा व्हीडिओ केला आहे. ते व्हीडिओत म्हणतात की, नरेंद्र मोदी यांनी हे ऐकावे की, तुम्ही आग लावली आहे आणि विझवू. आम्ही प्रार्थना करतो की, तुमच्या मानेपर्यंत हा सुरा पोहोचावा. आमच्या नबीच्या विरोधात केलेल्या गुस्ताखीची शिक्षा म्हणजे शीर धडावेगळे करणे.

हे ही वाचा:

माकडाला चिप्स देताना तो पडला दरीत!

सरकारला आली जाग! औरंगाबादचे संभाजीनगर करणार

जे अडीच वर्षात घडले नाही, ते आता घडतंय…

मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालक पदाचा दिला राजीनामा   

 

या घटनेनंतर तेथील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद केली. स्थानिक लोकांनी या घटनेच्या निषेधार्थ निदर्शने केली. स्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात घेतल्यानंतर मोठ्या संख्येने पोलिस फौजफाटा मागविण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,916चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
22,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा