29.2 C
Mumbai
Saturday, May 17, 2025
घरविशेष९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी फारूक टकलाला पाच वर्षांची शिक्षा

९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी फारूक टकलाला पाच वर्षांची शिक्षा

Google News Follow

Related

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी फारूक टकलाला पासपोर्ट बनवण्यात फसवणूक केल्याच्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. टकला हा या स्फोटांच्या मुख्य कटकर्त्यांपैकी एक मानला जातो. ६६ वर्षीय फारूक यासीन मन्सूर ऊर्फ फारूक टकला याला २०१८ मध्ये बनावट पासपोर्टवरून दुबईहून भारतात परतताना अटक करण्यात आली होती. शनिवारी त्याला दोषी ठरवण्यात आलं आणि सोमवारी कोर्टाने शिक्षेचा आदेश दिला.

अदालतीच्या दस्तऐवजांनुसार, टकलाने ‘मुस्ताक मोहम्मद मियाँ’ या बनावट नावाचा वापर करून पासपोर्ट आणि त्याच्या नूतनीकरणासाठी अर्ज केला होता. या अर्जात त्याने चुकीची माहिती आणि बनावट स्वाक्षऱ्या केल्या होत्या. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. डी. चव्हाण यांनी शिक्षेचा आदेश देताना म्हटलं, “आरोपीने आपली खरी ओळख लपवण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा..

आसाम: भारतविरोधी टिप्पण्या, आमदारासह ४२ जणांना अटक!

‘द केरल स्टोरी’ ला दोन वर्षे पूर्ण काय म्हणाली अदा शर्मा?

अफजाल अन्सारी म्हणतात कठोर कारवाई करा

पाणीभरावावर नियंत्रणासाठी ‘एकत्रित कमांड सेंटर’

फारूक टकला हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय असून त्याला २०१८ मध्ये दुबईतून अटक करून मुंबईत डिपोर्ट करण्यात आलं होतं. त्याच्याविरोधात १९९५ मध्ये रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. याआधी, एप्रिल महिन्यात मुंबईच्या विशेष टाडा कोर्टाने, १९९३ स्फोटांचे मुख्य आरोपी टायगर मेमन आणि त्याच्या कुटुंबियांच्या १४ मालमत्ता केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले होते. या मालमत्तांमध्ये फ्लॅट्स, प्लॉट्स, ऑफिस आणि दुकाने समाविष्ट आहेत.

१९९३ मधील बॉम्बस्फोटांमध्ये २५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि शेकडो लोक जखमी झाले होते. हा देशातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एक मानला जातो. या स्फोटांमागे दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन यांचा हात होता. यगर मेमन अजूनही फरार आहे. त्याचा भाऊ याकूब मेमनला २०१५ मध्ये फाशी देण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
248,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा