28 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
घरविशेष२० भारतीय अजूनही रशियात, त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार प्रयत्नशील!

२० भारतीय अजूनही रशियात, त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार प्रयत्नशील!

परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

Google News Follow

Related

परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) गुरुवारी उघड केले की, रशियामध्ये अजूनही २० भारतीय अडकले आहेत आणि भारत सरकार त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे.परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, रशियामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना तेथील संघर्ष क्षेत्रातून परत आणण्यासाठी भारत सरकार तेथील रशियन अधिकऱ्यांच्या संपर्कात आहे.दरम्यान, अनेक भारतीय चांगल्या नोकऱ्या मिळवण्याच्या बहाण्याने रशियात गेले परंतु युक्रेनशी युद्ध करण्यास त्यांना पाडले गेले आहे.

अशीच एक व्यक्ती आहे जी रशियात जाऊन फसली.हैदराबादमधील मोहम्मद सुफियान असे या तरुणाचे नाव आहे.मोहम्मद सुफियान याला एजंटांनी फसवले आणि रशियन सैन्यात भरती होण्यास भाग पाडले.मोहम्मद सुफियान याला भारतात परत आणण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली आणि फसवणूक करणाऱ्या एजंटांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा:

अखेर शाहजहां शेख सहा वर्षांसाठी झाला निलंबित

धरमशाला कसोटीत केएल राहुल बाहेर; बुमराहचे पुनरागमन

“सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्या बडगुजरांचे संजय राऊत गॉडफादर”

हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे सहा आमदार अपात्र!

या संदर्भात एमईएचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, आम्हाला समजले आहे की, अजूनही २० लोक रशियामध्ये अडकले आहेत.त्यांच्या सुटकेसाठी आम्ही आमच्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.या अगोदर त्यांच्या खबदारीसाठी आम्ही दोन विधाने जारी केली आहेत, ती तुम्ही पाहिली आहेत.यामध्ये आम्ही लोकांना युद्धक्षेत्रात जाऊ नका आणि कोणत्याही कठीण परिस्थितीत अडकू नका, असे सांगितले आहे.ते पुढे म्हणाले, आम्ही या प्रकरणी रशियन अधिकाऱ्यांच्या नियमित संपर्कात आहोत.

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला रशियन सैन्यात समर्थन भूमिकेसाठी भारतीय नागरिकांना भरती करण्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.तेव्हा परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबद्दल चेतावणी दिली होती.अशा परिस्थितीत तेथील भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन आणि भारतीयांना संघर्ष क्षेत्रापासून दूर राहण्याचा सल्ला, परराष्ट्र मंत्रालयाने दिला होता.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा